एक्स्प्लोर

खासदार उदयनराजे यांना अखेर अटक

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांनी सातारा शहर पोलिस स्टेशनला हजेरी लावली.

सातारा : साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांना अखेर अटक झाली आहे. खंडणीचा आरोप असलेल्या उदयनराजेंचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसापूर्वीच फेटाळला होता. आज त्यांनी आज सातारा शहर पोलिस स्टेशनला हजेरी लावली. त्यानंतर उदयनराजेंना अटक करण्यात आली. त्यामुळे उदयनराजे पोलिस ठाण्यात हजर राहणार की नाही याबाबत चर्चा रंगली होती. अखेर आज सकाळी उदयनराजे कार्यकर्त्यांसह सातारा पोलिस स्टेशनमध्ये हजेरी लावली. दरम्यान, वैद्यकीय तपासणीसाठी उदयनराजेंना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु तिथे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी पाहिल्यानंतर शासकीय विश्रामगृहातच त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. इथेच अटकेची कागदोपत्री पूर्ण प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर उदयनराजेंना न्यायालयात नेण्यात आलं. तिथे त्यांना न्यायाधीशांसमोर हजर केलं जाईल. दुसरीकडे, उदयनराजेंच्या अटकेच्या निषेधार्थ साताऱ्यात नागरिकांनी उत्स्फूर्त बंद पाळला आहे. Satara-Udayan-Raje काय आहे प्रकरण? लोणंद येथील सोना अलाईज कंपनीचे मालक राजकुमार जैन यांना खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी उदयनराजे भोसलेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यासोबत तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी 9 जणांना अटकही करण्यात आली आहे. उदयनराजे यांनी याप्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. पण हायकोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री उदयनराजे यांनी हजारो समर्थकांसह साताऱ्यात जोरदार एंट्री केली. यावेळी मोठ्या प्रमाणात समर्थक रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं होतं. दरम्यान, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेस खासदार राजीव सातव, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही उदयनराजेंना पाठिंबा दिला आहे. संभाजी भिडे गुरुजींचा इशारा “खासदार उदयनराजे भोसले यांना अटक करण्यासाठी चाललेले प्रयत्न थांबवावेत. उदयनराजेंना अटक म्हणजे उभ्या महाराष्ट्राला चिड निर्माण करणारी गोष्ट आहे. त्यांची अटक आम्ही कधीच खपवून घेणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रभर पेटून उठू आणि रस्त्यावर येऊ”, असा इशारा संभाजी भिडे गुरुजी यांनी दिला. “उदयनराजेंवर केलेले आरोप घाणेरडे आहेत. मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावं. उदयनराजे असं वागतील यावर परमेश्वरही विश्वास ठेवणार नाही. त्यांना अटक झाली तर महाराष्ट्र शासनाकडून खूप मोठं पाप होईल आणि त्यांनी ते करु नये”, असंही ते म्हणाले. संबंधित बातम्या अटक करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची उदयनराजेंसोबत गळाभेट उदयनराजेंना अटक झाल्यास महाराष्ट्र पेटून उठेल : संभाजी भिडे गुरुजी कोल्हापूरच्या संभाजीराजेंचा उदयनराजेंना पाठिंबा! खा. उदयनराजेंवर कारवाई होणारच : गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हजारो समर्थकांसह उदयनराजेंचं साताऱ्यात शक्तीप्रदर्शन उदयनराजे भोसले पोलिसांसमोर हजर होण्याची शक्यता छत्रपतींच्या घराण्याला बदनाम करण्याचे षडयंत्र : आव्हाड उदयनराजेंना अटक होण्याची शक्यता, हायकोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुंबईत हायड्रो गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीवर कारवाई
Maharashtra Live blog updates: मुंबईत हायड्रो गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीवर कारवाई
हा तर केंद्राचा वाढत असलेला दबाव, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून साखर कारखाने चालू करण्याचा प्रयत्न करू नयेत, परिणाम चांगले होणार नाहीत; राजू शेट्टींचा गर्भित इशारा
हा तर केंद्राचा वाढत असलेला दबाव, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून साखर कारखाने चालू करण्याचा प्रयत्न करू नयेत, परिणाम चांगले होणार नाहीत; राजू शेट्टींचा गर्भित इशारा
Teacher Bharti Scam: शिक्षक नियुक्ती घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट, 2012 नंतरच्या शिक्षकांच्या नियुक्त्या संशयाच्या भोवऱ्यात; नागपूर विभागातीत 1397 शिक्षकांची फेरपडताळणी होणार
शिक्षक नियुक्ती घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट, 2012 नंतरच्या शिक्षकांच्या नियुक्त्या संशयाच्या भोवऱ्यात; नागपूर विभागातीत 1397 शिक्षकांच्या नियुक्तीची फेरपडताळणी होणार
Onkar Elephant Sindhudurg: ओंकार हत्तीवर वनविभागाच्या कर्मचाऱ्याने चक्क आगीच्या मशाली फेकल्या; सिंधुदुर्गातील चीड आणणार प्रकार
ओंकार हत्तीवर वनविभागाच्या कर्मचाऱ्याने चक्क आगीच्या मशाली फेकल्या; सिंधुदुर्गातील चीड आणणार प्रकार

व्हिडीओ

Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हा तर केंद्राचा वाढत असलेला दबाव, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून साखर कारखाने चालू करण्याचा प्रयत्न करू नयेत, परिणाम चांगले होणार नाहीत; राजू शेट्टींचा गर्भित इशारा
हा तर केंद्राचा वाढत असलेला दबाव, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून साखर कारखाने चालू करण्याचा प्रयत्न करू नयेत, परिणाम चांगले होणार नाहीत; राजू शेट्टींचा गर्भित इशारा
Teacher Bharti Scam: शिक्षक नियुक्ती घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट, 2012 नंतरच्या शिक्षकांच्या नियुक्त्या संशयाच्या भोवऱ्यात; नागपूर विभागातीत 1397 शिक्षकांची फेरपडताळणी होणार
शिक्षक नियुक्ती घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट, 2012 नंतरच्या शिक्षकांच्या नियुक्त्या संशयाच्या भोवऱ्यात; नागपूर विभागातीत 1397 शिक्षकांच्या नियुक्तीची फेरपडताळणी होणार
Onkar Elephant Sindhudurg: ओंकार हत्तीवर वनविभागाच्या कर्मचाऱ्याने चक्क आगीच्या मशाली फेकल्या; सिंधुदुर्गातील चीड आणणार प्रकार
ओंकार हत्तीवर वनविभागाच्या कर्मचाऱ्याने चक्क आगीच्या मशाली फेकल्या; सिंधुदुर्गातील चीड आणणार प्रकार
Ketan Agrawal Case : ‘माही’च्या फोटोचा गैरवापर करून केतनला लोहगडावर बोलावलं; 'त्या' मैत्रिणीलाही सिया-चेतनकडून धमकी, केतनला फोन करण्यासाठी घातली गळ, मैत्रिणीनं पोलिसांना सगळं सांगितलं
‘माही’च्या फोटोचा गैरवापर करून केतनला लोहगडावर बोलावलं; 'त्या' मैत्रिणीलाही सिया-चेतनकडून धमकी, केतनला फोन करण्यासाठी घातली गळ, मैत्रिणीनं पोलिसांना सगळं सांगितलं
Thane Crime Pradeep Purnekar death: हल्लेखोरांनी गणपतीत येऊन एरियाची रेकी केली अन् संधी मिळताच डाव साधला, ठाकरे गटाच्या प्रदीप पूर्णेकरांना कसं संपवलं? वाचा काय काय घडलं?
गणपतीत इकडे येऊन बसायचे, एरियाची रेकी केली अन् संधी मिळताच डाव साधला, ठाकरे गटाच्या प्रदीप पूर्णेकरांना कसं संपवलं? वाचा काय काय घडलं?
Eknath Shinde Nandanvan : एकनाथ शिंदेंच्या घरी गणरायाच्या दर्शनाला गेल्या; दर्शन घेताना बाजूला ठेवलेला मोबाईल गायब, शायना एनसी यांच्यासोबत नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदेंच्या घरी गणरायाच्या दर्शनाला गेल्या; दर्शन घेताना बाजूला ठेवलेला मोबाईल गायब, शायना एनसी यांच्यासोबत नेमकं काय घडलं?
Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची सुवर्ण कामगिरी; चीनचा पराभव करत महिलांच्या कंपाऊंड तिरंदाजी विश्वचषकात दणदणीत विजय; विश्वविक्रमाशीही बरोबरी!
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची सुवर्ण कामगिरी; चीनचा पराभव करत महिलांच्या कंपाऊंड तिरंदाजी विश्वचषकात दणदणीत विजय; विश्वविक्रमाशीही बरोबरी!
Bollywood Singer becomes Father: प्रसिद्ध बॉलिवूड गायक झाला बाबा, लेकाच्या जन्मानंतर सिंगरच्या पोटात आनंद मावेना; गुडन्यूज व्हायरल
प्रसिद्ध बॉलिवूड गायक झाला बाबा, लेकाच्या जन्मानंतर सिंगरच्या पोटात आनंद मावेना; गुडन्यूज व्हायरल
Embed widget