एक्स्प्लोर
...अन् ते गाणं ऐकताना उदयनराजे भावूक झाले
सध्या उदयनराजे भावूक झालेले दिसणारा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

सातारा : साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे या ना त्या कारणानं नेहमी चर्चेत असतात. त्यांचा आक्रमकपणा, डायलॉगबाजी अनेकदा लोकांना पहायला मिळते. मात्र सध्या उदयनराजे भावूक झालेले दिसणारा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
कार्यकर्त्यांनी उदयनराजे यांच्यावर रचलेलं एक गाणं ऐकताना उदयनराजे भावूक झाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हे गाणं ऐकताना राजेंना आपले अश्रू यावेळी रोखता आले नाहीत. व्हिडीओमध्ये उदयनराजे एका गाडीत बसलेले दिसतात. त्यावेळी त्यांना त्यांच्यावर रचलेलं 'आले रे, आले रे उदयनराजे' हे गाणं ऐकवण्यात येतं. हे गाणं ऐकताना ते भावूक झालेले दिसतात.
व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
