एक्स्प्लोर

खासदार उदयन राजेंना अंतरिम जामीन मंजूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उद्यनराजे यांना अंतरिम जामीन मंजूर झाला आहे.

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उद्यनराजे यांना अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. सातारा जिल्हा सत्र न्यायालयाकडून उदयनराजेंना जामीन मंजूर करण्यात आला. मारहाण आणि खंडणीप्रकरणी साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांना आज सकाळी अटक करण्यात आली होती. शासकीय विश्रामगृहात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना कोर्टात हजर केलं जाणार होतं. परंतु कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून उदयनराजेंना कोर्टात हजर केलं नाही. उद्योजकाला मारहाण आणि खंडणीचा आरोप असलेल्या उदयनराजेंचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसापूर्वीच फेटाळला होता. आज त्यांनी आज सातारा शहर पोलिस स्टेशनला हजेरी लावली. त्यानंतर उदयनराजेंना अटक करण्यात आली. दुसरीकडे, उदयनराजेंच्या अटकेच्या निषेधार्थ साताऱ्यात नागरिकांनी उत्स्फूर्त बंद पाळला आहे. तर उदयनराजेंच्या अटकेचा निषेध म्हणून शिवप्रतिष्ठानकडून उद्या सांगली जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. काय आहे प्रकरण? लोणंद येथील सोना अलाईज कंपनीचे मालक राजकुमार जैन यांना खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी उदयनराजे भोसलेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यासोबत तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी 9 जणांना अटकही करण्यात आली आहे. उदयनराजे यांनी याप्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. पण हायकोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री उदयनराजे यांनी हजारो समर्थकांसह साताऱ्यात जोरदार एंट्री केली. यावेळी मोठ्या प्रमाणात समर्थक रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं होतं. दरम्यान, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेस खासदार राजीव सातव, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही उदयनराजेंना पाठिंबा दिला आहे. संभाजी भिडे गुरुजींचा इशारा “खासदार उदयनराजे भोसले यांना अटक करण्यासाठी चाललेले प्रयत्न थांबवावेत. उदयनराजेंना अटक म्हणजे उभ्या महाराष्ट्राला चिड निर्माण करणारी गोष्ट आहे. त्यांची अटक आम्ही कधीच खपवून घेणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रभर पेटून उठू आणि रस्त्यावर येऊ”, असा इशारा संभाजी भिडे गुरुजी यांनी दिला. “उदयनराजेंवर केलेले आरोप घाणेरडे आहेत. मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावं. उदयनराजे असं वागतील यावर परमेश्वरही विश्वास ठेवणार नाही. त्यांना अटक झाली तर महाराष्ट्र शासनाकडून खूप मोठं पाप होईल आणि त्यांनी ते करु नये”, असंही ते म्हणाले. संबंधित बातम्या खासदार उदयनराजे यांना अखेर अटक अटक करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची उदयनराजेंसोबत गळाभेट उदयनराजेंना अटक झाल्यास महाराष्ट्र पेटून उठेल : संभाजी भिडे गुरुजी कोल्हापूरच्या संभाजीराजेंचा उदयनराजेंना पाठिंबा! खा. उदयनराजेंवर कारवाई होणारच : गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हजारो समर्थकांसह उदयनराजेंचं साताऱ्यात शक्तीप्रदर्शन उदयनराजे भोसले पोलिसांसमोर हजर होण्याची शक्यता छत्रपतींच्या घराण्याला बदनाम करण्याचे षडयंत्र : आव्हाड उदयनराजेंना अटक होण्याची शक्यता, हायकोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget