एक्स्प्लोर
शरीरसुखाच्या मागणीचा व्हॉट्सअॅप, साताऱ्याचे काँग्रेस आमदार अडचणीत
सातारा : महिलेला अश्लिल मेसेज करुन शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप असलेले साताऱ्याचे काँग्रेस आमदार अडचणीत येण्याची शक्यता आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर आमदार जयकुमार गोरे सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले आहेत.
सोमवारी जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला होता. त्यामुळे जयकुमार यांना अटक करण्यासाठी काल पोलिसांची पथकं रवाना झाली होती, मात्र आज ते स्वतःच पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत.
गोरे यांनी आपल्याला व्हॉट्सअॅपवरुन अश्लिल मेसेज पाठवला, तसंच शरीरसंबंधांची मागणी करत आपला विनयभंग केल्याची तक्रार साताऱ्यातील एका महिलेनं शहर पोलीस ठाण्यात केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी जयकुमार यांनी अर्ज दाखल केला होता.
संबंधित बातम्या :
काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरेंवर विनयभंगाचा गुन्हा दाखल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement