सांगली :  पद मिळाल्यावर माणसं बेताल होतात, अश टीका  माजी खासदार संजयकाका पाटील (Sanjay Kaka Patil)  यांची खासदार विशाल पाटील (Vishal Patil)  यांच्यावर  केलेली आहे.  मिळालेले पद माझ्या कौशल्यावर, हिंमतीवर,  मिळवले आहे, असेही संजयकाका पाटील म्हणाले. ते सांगलीत माध्यमांशी बोलत होते. 


अलीकडच्या काळामध्ये राजकीय जीवनामध्ये माणसाला पद, प्रतिष्ठा मिळाली की माणूस बेफाम होत चालला आहे.  मिळालेले पद माझ्या कौशल्यावर,  हिंमतीवर मिळवले असा भ्रम तयार होतोय,  त्यामुळे माणसं बेताल होत आहेत, पण दिलेले पद लोकांनी कामासाठी दिलेले आहे याचा विसर पडतोय. याचे उदाहरण म्हणजे सांगलीचे नवनियुक्त खासदार आहेत असे म्हणत  माजी खासदार संजयकाका पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांच्यावर टीका केलीय. 


आमदार रोहित पाटील असेल आम्ही त्याना  मदत करू : विशाल पाटील 


खासदार विशाल पाटील यांनी काही दिवसापूर्वी खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांना विधानसभा निवडणुकीत मदत करू असा शब्द दिला होता. त्यानंतर तासगाव कवठेमंकाळमध्ये अजितराव घोरपडे शिवाय पर्याय नाही असं म्हणत घोरपडे याना पाठिंबा दिला. त्यानंतर काही दिवसातच एका सभेमध्ये तासगाव कवठेमहांकाळचा  आमदार रोहित पाटील असेल आम्ही त्याना  मदत करू असं विशाल पाटील  म्हणाले. खासदार विशाल पाटील यांच्या या सर्व  वक्तव्यावरून आणि पाठिंबावरून माजी खासदार संजयकाका पाटील यांनी विशाल पाटील यांच्यावर टीका केली आहे. 


काय म्हणाले विशाल पाटील?


आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तासगाव महाकाळ मतदारसंघातून रोहित पाटील यांच्या रूपात आमदार निवडून द्यायचे असल्याचे म्हणाले. रोहित पाटील टेन्शन घेऊ नका राजकारण चालू राहत असते. रोहितच्या रूपाने चांगला आमदार देण्याची इच्छा स्वतः शरद पवार यांनी बोलून दाखवली आहे. वसंतदादा कुटुंब रोहित पाटील यांच्यासोबत आणि त्यांच्या कुटुंबासोबत कायम उभा राहील असा विश्वास सुद्धा विशाल विशाल पाटील यांनी देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, खासदार विशाल पाटील यांनी केलेल्या विधानामुळे जिल्ह्याच्या राजकारणात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात रोहित पाटील व माजी खासदार संजय पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 


हे ही वाचा :


Tasgaon-Kavathe Mahankal Vidhan Sabha : आर. आर. आबांच्या लेकाविरोधात खासदार विशाल पाटील बंडाळी करणार? तासगाव-कवठेमहांकाळमध्ये वेगळीच चाल!