एक्स्प्लोर

Rajesh Kshirsagar : संजय राऊत, विनायक राऊत हे कान फुकरे, माझ्याबाबत त्यांनी उद्धवजींचे कान फुंकले; राजेश क्षीरसागरांचा आरोप

राजेश क्षीरसागर यांनी खासदार संजय राऊत आणि विनायक राऊत यांच्यावर कडाडून हल्ला चढवला आहे. संजय राऊत, विनायक राऊत हे कान फुकरे नेते असून माझ्याबाबतही त्यांनी उद्धवजींचे कान फुंकल्याचा आरोप केला. 

Rajesh Kshirsagar : राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी खासदार संजय राऊत आणि विनायक राऊत यांच्यावर कडाडून हल्ला चढवला आहे. संजय राऊत, विनायक राऊत हे कान फुकरे नेते असून माझ्याबाबतही त्यांनी उद्धवजींचे कान फुंकल्याचा आरोप केला. 

क्षीरसागर यांनी संजय राऊत यांच्यावर चांगलेच टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, प्रत्येक गटात एकनाथ शिंदे असतात म्हणणाऱ्या संजय राऊत यांनी प्रत्येक पक्षात कान फुकरे संजय राऊत, विनायक राऊत असतात हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. क्षीरसागर यांनी आव्हाड यांच्यावरही टीका केली. जितेंद्र आव्हाड म्हणजे नाटक कंपनीतील कलाकार आहेत.  त्यांनी राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाटकात काम करावं. खोटं बोल पण रेटून बोल ही त्यांची वृत्ती असून  काहीही करून चर्चेत राहायचं हा आव्हाड यांचा उद्योग असल्याचा टोला यांनी लगावला. 

पोलिस कारवाईवरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड राज्य सरकारवर आरोप करत आहेत. आव्हाड यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यावर केलेल्या आरोपांचा क्षीरसागर यांनी समाचार घेतला. पोलिस विनाकारण गुन्हे दाखल करत नाहीत आणि न्याय मागण्यासाठी कोर्ट असल्याचे ते म्हणाले. 

तीन दिवसांचे भाडे घेण्याचा निर्णय रद्द; राजेश क्षीरसागर यांची माहिती 

दरम्यान, सौंदत्ती यात्रेसाठी कोल्हापुरातून जाणाऱ्या भाविकांसाठी एसटीकडून तीन दिवसांचे भाडे घेण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आदेश दिल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. या निर्णयाने भाविकांना फक्त जाता-येताचे 370 किलोमीटरचेच भाडे द्यावे लागणार आहे. यापूर्वी या यात्रेसाठीचा खोळंबा आकार पूर्ण माफ केला आहे. पण या वर्षी एस.टी. महामंडळाने एसटी भाड्यापोटी 370 किलोमीटरने तीन दिवसांचे भाडे आकारणी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच भाडे प्रति किलोमीटर 54 रुपये धरले आहे. त्यामुळे कोल्हापुरातील भक्तांना याचा मोठा आर्थिक फटका बसणार होता.

याविषयी क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शनिवारी भेट घेऊन विनंती केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी तत्काळ परिवहन आयुक्त शेखर चेन्ने यांना फोन करून आदेश दिले. त्यानुसार तीन दिवसांच्या यात्रेसाठी कोल्हापुरातील भाविकांच्याकडून आता 370 किलोमीटरचे भाडे आकारणी होणार आहे. त्यामुळे सौंदत्ती भाविकांची यात्रा सुखकर होणार आहे.
सौंदत्ती यात्रा 8डिसेंबर रोजी होत आहे

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget