मुंबई : मागील तीन दिवसांपासून सत्ताधारी नेत्यांचे गुंडांसोबत होणाऱ्या भेटीचे फोटो ट्वीट करणाऱ्या संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज देखील असाच एक फोटो ट्वीट केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि पुण्यातील (Pune) नामचीन गुंड जितेंद्र जंगम (Jitendra Jangam) यांचा हा फोटो आहे. शिंदे गटात जंगम याने प्रवेश केला होता आणि तोच फोटो राऊत यांच्याकडून शेअर करण्यात आला आहे. सोबतच राऊत यांनी यावरून पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत दिसत असलेली ही व्यक्ती पुण्यातील नामचीन गुंड जितेंद्र जंगम आहे. मागीलवर्षी पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणूकीवेळी जितेंद्र जंगमने शिंदे गटात प्रवेश केला. तेव्हाचा हा फोटो आहे. जितेंद्र जंगमवर हत्येचा प्रयत्न,  मारामारी,  खंडणी असे सात गंभीर गुन्हे नोंद असून 2021 मधे त्याच्यावर त्याच्या टोळीसह मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मागीलवर्षी कसबा निवडणुकीआधी म्हणजेच जानेवारी 2023 मधे त्याची जामीनावर सुटका झाली आणि त्याने शिंदे गटात प्रवेश केला होता. खासदार संजय राऊत यांनी हाच फोटो ट्विट केलाय.


संजय राऊत यांचे ट्वीट...


दरम्यान याबाबत ट्वीट करत संजय राऊत म्हणाले की, “पुण्याचे नवे पोलीस आयुक्त महोदयांनी काल म्हणे गुंडांची परेड घेऊन इशारा दिला. राजकारण्यांच्या आसपास फिरकायचे नाही वैगरे..छान!.. काही गुंड टोळ्या आणि त्यांचे प्रमुख मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत थेट मींधे गँगमध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांची परेड काढणार काय? हातात भगवा घेतलेले हे महात्मा कोण आहेत? हा पुण्यातला गुन्हेगार आहे. याच्यावर खुन, खुनाचा प्रयत्न, चोरी, अपहरण असे गुन्हे आहेत व मोकामधुन नुकताच बाहेर आला आहे महाराष्ट्रात गुंडांनी गुंडासाठी चालविलेले राज्य! (काल सरकारचे बाळराजे कोठे होते? त्यांच्या खास गँग बरोबर सुलतानपूर रिसॉर्ट मध्ये साग्र संगीत बरेच काही करीत होते..या राज्याचे कठीण आहे).." असे राऊत म्हणाले.  




इतर महत्वाच्या बातम्या : 


आधी कुख्यात गुंड श्रीकांत शिंदेंसोबत 'वर्षा' बंगल्यावर दिसला, आता पुण्यातील गॅंगस्टर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला