NCP Crisis Latest Update : शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून नवे नाव, चिन्हासाठी चाचपणी सुरु झाली आहे. निवडणूक आयोगाने पक्षाचं चिन्ह (Symbol) आणि पक्ष (Party) अजित पवारांकडे (Ajit Pawar) सोपवल्यावर आता शरद पवार गटाकडून नव्या नावांचा (New Party Name) विचार सुरू आहे. शरद  पवार काँग्रेस, मी राष्ट्रवादी, शरद स्वाभिमानी पक्ष या नावांचा पर्याय सध्या चाचपून पाहिला जातोय. तर कपबशी, सूर्यफूल, चष्मा, उगवता सूर्य या चिन्हांचा विचार सुरू आहे.


शरद पवार गटाकडून नवे नाव, चिन्हासाठी चाचपणी


शरद पवार गटाला मंगळवारी दुपारपर्यंत नवीन पक्षाचं नाव निवडणूक आयोगाकडे (Election Commission) द्यावं लागणार आहे. पक्षाचं चिन्ह नंतर दिलं तरी चालेल, मात्र पक्षाचं नाव आज दुपारपर्यंत द्यावं लागणार आहे. दरम्यान, आज दुपारपर्यंत शरद पवार गटाकडून नाव आणि पक्षाचं चिन्ह सादर करण्यात येणार आहे. नव्या पक्षासाठी शरद पवार काँग्रेस, मी राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी स्वाभिमानी पक्ष या नावांचा विचार आणि चर्चा सुरु आहे. तर चिन्हांसाठी कपबशी, सूर्यफूल, चष्मा, उगवता सूर्य या चिन्हांचा विचार सुरु आहे. काही वेळात या संदर्भात निर्णय समोर येईल.


निवडणुकीआधी शरद पवारांना मोठा धक्का


महाराष्ट्रातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचाच आहे, असा निर्वाळा निवडणूक आयोगानं दिला आहे. पक्ष आणि घड्याळ चिन्ह निवडणूक आयोगानं अजित पवार गटाला दिलं आहे, तर शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली आहे. लोकसभा निवडणुकीआधी शरद पवार गटाला हा अतिशय मोठा धक्का आहे. कारण महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरेंच्या हातून याआधीच पक्ष गेला होता, त्यात आता शरद पवारांची देखील भर पडली आहे. 


शरद पवारांची भूमिका काय?


अजित पवारांना राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवारांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. शरद पवारांच्या भूमिकेबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. पक्ष आणि चिन्हाचं नाव ठरल्यानंतर शरद पवार माध्यमांसमोर प्रतिक्रिया देण्याची शक्यता आहे. राज्यसभेच्या अधिवेशनानंतर शरद पवार त्यांच्या भूमिकेबाबत खुलासा करण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. 


पाहा व्हिडीओ : शरद पवार गटाकडून कोणत्या नाव आणि चिन्हाचा विचार? शरद पवार काँग्रेस की शरद स्वाभिमानी पक्ष?



महत्त्वाच्या इतर बातम्या :


NCP Crisis : शरद पवारांपेक्षा अजित पवार सरस? शरद पवारांचा पराभव झाला की हा सगळा ड्रामा? पिंपरी चिंचवडकर म्हणतात...