मुंबई : निवडणूक आयोग (Election Commission) आणि ईडी (ED) हे केंद्र सरकारचे पोपट आहे, अशी टीका खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) केली आहे. जिथे भाजपचा (BJP) पराभव होतो, तिथे ईडी कारवाई करते,असा आरोप खासदार संजय राऊतांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले, निवडणूक आयोग आणि ईडी दोन्ही केंद्र सरकारचे पोपट आहे. आम्हाला त्याचा अनुभव आहे. 2024 पर्यंत देशात अशीच परिस्थिती राहणार आहे. जिथे भाजपचे सरकार नाही. जिथे भाजपचा पराभव होतो तिथे ईडीची कारवाई सुरु होते. निवडणूक आयोग हे ईडी आणि सीबीआयप्रमाणे भारतीय जनता पार्टीचा पिंजऱ्यातला पोपट आहे. ज्या पद्धतीने शिवसेनेच्या बाबतीत महाराष्ट्रात इलेक्शन कमिशनरने निर्णय घेतला हा पूर्णपणे तसरकारच्या दबावाखाली घेतला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आहे. शिवसेनेचे वीस पंचवीस आमदार इकडे तिकडे गेले म्हणून संपूर्ण शिवसेना एका फुटीर गटाच्या हातात ठेवावी. त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशनची नियत आणि बिघडलेले चरित्र दिसते अशा कमिशनकडे जाऊन काय न्याय मिळणार आहे. शरद पवार हयात आहेत. पक्षाचे संस्थापक आणि त्यांचा पक्ष अजित पवार यांना दिला जातो असे इलेक्शन कमिशनर आपल्याला लाभले आहे.
महाराष्ट्रामध्ये कमजोर अस्थिर सरकार
कॅबिनेटमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा गँगवॉरसारखी स्थिती निर्माण झाली आहे. मंत्री ऐकमेकांच्या अंगावर धावून जात आहे.अशी परिस्थिती महाराष्ट्रात कधी नव्हती. महाराष्ट्रामध्ये कमजोर अस्थिर सरकार बसले आहे. मुख्यमंत्र्यांना कोणी जुमानत नाही भाजप यांना जुमानत नाही. मुख्यमंत्री जर आपल्या मंत्र्यांवरती नियंत्रण मिळू शकत नाही तर मंत्र्यांमध्ये प्रमुख म्हणून बसण्याचा त्यांना अधिकार नाही.भुजबळ एक बोलतात शंभुराज देसाई दुसरेच बोलतात, असे संजय राऊत म्हणाले.
24 डिसेंबरनंतर महाराष्ट्रात काय होईल सांगता येणार नाही
मनोज जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबर ही डेडलाईन दिली आहे. 24 डिसेंबरनंतर या महाराष्ट्रात काय होईल हे कोणी सांगू शकत नाही. जरांगे पाटील यांनी मुंबईचा नाक बंद करण्याचा इशारा दिला आहे जर मुख्यमंत्र्यांनी एक गांभीर्याने घेतलं नाही तर या देशात महाराष्ट्राची बेअब्रू होईल. बिहार आणि तामिळनाडू करु शकतो तर महाराष्ट्र देखील करू शकतो. जरांगे पाटील यांनी मुंबईचा नाक बंद करण्याचा इशारा दिला आहे जर मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतलं नाही तर या देशात महाराष्ट्राची बेअब्रू होईल, असे संजय राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री आणि त्यांच्या लोकांची माफियागिरी सुरू
मुख्यमंत्री आणि त्यांच्या लोकांची जी माफियागिरी सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात निर्माण केलेल्या शाखा या तुम्ही ताब्यात घेत आहे आणि बुलडोजर फिरवत आहात आणि ही मस्ती फार काळ राहणार नाही. पोलिसांना मी काल इशारा दिला आहे. मुंब्य्रातील शाखा बाळासाहेब ठाकरेंपासूनआहे. तुम्ही सत्तेच्या जोरावर शाखा ताब्यात घेत आहे. त्या शाखेत बाळासाहेबांचा फोटो छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे आणि त्या शाखेवर तुम्ही फिरवत आहात ही मोगलाई सुरू आहे, असे देखील संजय राऊत म्हणाले.
हे ही वाचा :
Maratha Reservation: मराठा समाजाचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना धसका, मंचर एसटी आगाराचा उद्घाटन सोहळा केला रद्द