IMD Weather Forecast : राज्यासह देशातील हवामानात (Weather News) मोठा फरक जाणवत आहे. पहाटे हवेत गारवा (Winter) पाहायला मिळत आहे. तर राज्यासह देशभरात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावल्याचं दिसून येत आहे. राज्यासह देशात पुढील 24 तासात पावसाची (Rain Prediction) शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणासह (Kokan) गोव्यालाही (Goa) जोरदार पावसाचा फटका बसणाक आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे महाराष्ट्रासह (Maharashtra Weather Latest News) देशात अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. अरबी समुद्रात (Arebian Sea) कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हवामानात मोठा (Climate) बदल दिसून येत आहे. यंदाच्या दिवाळीत अवकाळी पावसाची हजेरी (Rain Update) लावली आहे.


कोकणासह मध्य महाराष्ट्रात अवकाळी पाऊस


राज्यात कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली लातूर या सह अनेक भागात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. बुधवारीही या भागात अवकाळी पाऊस पाहायला मिळाला आहे. येत्या 24 तासात गोवा कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाने दिला आहे. यासोबतच हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.






वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात बदल


येत्या दोन दिवसांत देशातील अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आज 9 नोव्हेंबर रोजी तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हिमालयीन भागात 10 नोव्हेंबरपर्यंत पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या भागात हिमवृष्टी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर-पश्चिम राजस्थानमध्ये हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.


'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता


हवामाना खात्याने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, शुक्रवारी 10 नोव्हेंबर रोजी पंजाब, हरियाणा आणि उत्तर-पश्चिम राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीत एक किंवा दोन ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, दिल्लीत पाऊस झाल्यास दिल्लीतील लोकांना प्रदूषणापासून दिलासा मिळू शकतो. हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, पुढील दिवशी काही दिवस देशाच्या विविध भागात पाऊस पडू शकतो. 11 नोव्हेंबरनंतर दक्षिणेकडील द्वीपकल्पात पावसाचे प्रमाण कमी होईल. पुढील तीन दिवस गोवा आणि दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Mumbai Rain : मुंबईत ऊन-पावसाचा खेळ! अचानक आलेल्या पावसाने मुंबईकरांची तारांबळ