जळगाव:  आम्हाला गद्दार म्हटलं गेलं असलं तरी आम्ही कोणतीही गद्दारी केली नाही. पक्षाचे विचार आम्ही सोडले नाहीत, पक्ष वाचवण्यासाठी आम्ही वेगळे झालो, बहुमताच्या आधारावर आमच्या बाजूने हा निकाल लागला अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिली आहे.  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संजय राऊतांसारखे (Sanjay Raut) भूत आवरावे हाच असा सल्ला उद्धव ठाकरेंना गुलाबराव पाटलांनी दिला आहे.  ते जळगावात बोलत होते.


एकनाथ खडसे यांनी घटनेतील त्रुटी शोधून हा निकाल दिला असल्याची प्रतिक्रिया दिली होती त्याला उत्तर देताना पाटील यांनी म्हटले आहे की, एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी पक्षाबाबत बोलण्याचा त्यांना कोणताच अधिकार नाही. राष्ट्रवादी पक्षाने त्यांना भरपूर दिले आहे,राष्ट्रवादी फुटणार नाही याची काळजी घ्यावी आणि राष्ट्रवादीबाबत चांगला विचार करावा. शिवसेनेनं जो पवित्रा घेतला आहे तोच पवित्रा अजित पवार यांनी घेतला आहे. हा निकाल अन्यायकारक नाही,ज्या चाळीस लोकांनी पक्ष वाढविण्यासाठी  तुम्हाला सावध केले होते. तुम्ही त्याला महत्व दिले नाही उलट त्यांनी या बाबत विचार करायला हवा होता मात्र त्यांनी तो केला नाही. त्यामुळे ते जनतेत जरी फिरले तरी आम्ही गद्दारी केली असे जनता त्यांना म्हणणार नाही.  त्यांनी  गद्दारी केली नाही तर पक्ष वाचवला आहे.


उद्धव ठाकरेंनी संजय राऊतसारखे भूत आवरावे : गुलाबराव पाटील


उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतसारखे भूत आवरावे हाच आपला उध्दव ठाकरे यांना सल्ला  असल्याची प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.  घटना सुद्धा ज्यांना माहीत नाही ते काय पक्ष चालवणार ,ज्यांनी आमच्यावर आरोप केले त्यांना ही मोठी चपराक असल्याचं ही मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. आमदार अपत्राता प्रकरणी निकाल लागल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांचं जळगाव येथे आगमन झाले यावेळी रेल्वे स्थानकावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.


नेमका निकाल काय?


महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या शिंदे गट आणि ठाकरे गटाबाबतचं निकालवाचन बुधवारी पार पडलं.  एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. त्याचसोबत, शिंदे गटाच्या भरत गोगावले यांचा व्हिप अधिकृत ठरवत ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांचा व्हिप विधानसभा अध्यक्षांनी अवैध ठरवलाय.


हे ही वाचा :


बांगर एवढा माज चांगला नाही; जनताच तुम्हाला फाशी देईल; संतोष बांगर यांच्या चॅलेंजवर शिवाजीराव चोथेंचे जोरदार प्रत्युत्तर