Sanjay Raut  On Shinde Group : जागावाटपावरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु असतानाच, शिंदे गटामध्ये भाजपबाबत मोठी नाराजी असल्याची चर्चा आहे. यावरच बोलतांना ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर (Shinde Group) हल्लाबोल केला आहे. "गुलामांना काय आवाज असतो का? स्वाभिमानी लोक आवाज उठवू शकतात, ज्यांनी 50 कोटी रुपये घेऊन स्वतःचा ईमान विकला आहे, त्यांनी तिकिटासाठी भांडण करू नयेत असे टोला राऊत यांनी लगावला आहे. 


दरम्यान भाजपकडून पुन्हा लोटस ऑपरेशन राबवण्याची चर्चा सुरु असून, यावर बोलतांना राऊत म्हणाले की, "आप पक्षाला केलेली ऑफर खूप कमी आहे. महाराष्ट्रात 50  करोडचा हिशोब झालेला आहे. मग, पंजाब वाल्यांना एवढे कमी का देत आहेत. इलेक्ट्रॉन बाँडचे पैसे एवढ्या लवकर कसे संपले, पंजाब एवढा मोठा राज्य आहे आणि त्यांना फक्त 25 करोड, महाराष्ट्रात तुम्ही 50 करोडची बोली लावली होती. हा पंजाबचा अपमान आहे, भाजपचा हा खूपच घृनास्पद व्यवहार असल्याचा खोचक टोला राऊत यांनी लगावला आहे. 


आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक...


आज महाविकास आघाडीच्या तीन प्रमुख घटकांची बैठक आहे. ही बैठक खास करून प्रचार यंत्रणा, पुढील रणनीती, अजेंडा यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आहे. जागावाटप किंवा जागांची अदलाबदली यासंदर्भात तिथे कोणतीही चर्चा होणार नाही. कारण तो विषय संपलेला आहे. आता पुढील पाच टप्प्यात ज्या निवडणुका होत आहेत, त्यावेळेला एकत्र सभा घेणं, प्रचाराची दिशा काय असण, कोणत्या मुद्द्यावर आपण पुढे जायला हवं, राज्यातील प्रमुख प्रश्न कोणते आहेत, कोणत्या विभागात कोणी जायला हवं, उद्धव ठाकरे आणि शरद पवारजी यांची एकत्र सभा कुठे घ्यायला हवी यावर आज चर्चा होण्याची शक्यता असल्याचे संजय राऊत म्हणाले. 


प्रकाश आंबेडकरांचे विचार आमच्यासारखेच....


या देशात असलेली दळभद्री हुकूमशाही, शोषण सरकारकडून सुरू असलेला भ्रष्टाचार, संविधानाची हत्या यासाठी आम्ही जी एक लढाई करतोय,  त्यात बाळासाहेब आंबेडकरांशिवाय लढाई पूर्ण होऊ शकत नाही. संविधानाची रक्षा करणे ही आमचीच जबाबदारी नाही, तर आंबेडकरांची आहे. मी पूर्ण खात्रीने सांगू शकतो भाजपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत होईल अशा प्रकारचं कोणतही पाऊल आंबेडकर उचलणार नाहीत. आंबेडकर यांचे आणि आमचे विचार एक आहेत असेही राऊत म्हणाले. 



इतर महत्वाच्या बातम्या : 


ठाकरेंच्या यादीनंतर दोन संजय भिडले, खिचडी चोर म्हणणाऱ्या निरुपमांना राऊतांचं जशास तसं प्रत्युत्तर