एक्स्प्लोर

काश्मीरमध्ये भाजप नावाच्या वाघाने काय खाल्लं?, संजय राऊतांचा भाजपला सवाल

पीडीपी बरोबर जाऊ नका राष्ट्राच्या सुरक्षेसाठी घातक आहे हे आम्ही सांगत होतो तरीही भाजपाने सरकार बनवलं. त्यावेळी भाजपा नावाच्या वाघाने काय खाल्लं? होतं असा सवाल राऊत यांनी केला. काय खायचं काय फेकायचा हे आम्हाला कुणी शिकवू नका. आम्हाला राजकीय बाळकडू शिकवू नये, असेही ते म्हणाले.

मुंबई : 'शेर कभी घास नही खाता' या वनमंत्र्यांच्या वक्तव्यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. शिवसेना काँग्रेसच्या पाठिंब्याने महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार? या प्रश्नावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 'शेर कभी घास नही खाता' असे उत्तर दिले होते. त्यावर काश्मीरमध्ये भाजप नावाच्या वाघाने काय खाल्लं? मेहबूबा मुफ्ती यांना आता अटक करण्यात आली आहे. पण त्याच मेहबूबा मुफ्तींबरोबर जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने सरकार स्थापन केलं होतं, असा आरोप राऊत यांनी केला. ते एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात बोलत होते. पीडीपी बरोबर जाऊ नका राष्ट्राच्या सुरक्षेसाठी घातक आहे हे आम्ही सांगत होतो तरीही भाजपाने सरकार बनवलं. त्यावेळी भाजपा नावाच्या वाघाने काय खाल्लं? होतं असा सवाल राऊत यांनी केला. काय खायचं काय फेकायचा हे आम्हाला कुणी शिकवू नका. आम्हाला राजकीय बाळकडू शिकवू नये, असेही ते म्हणाले. दरम्यान वाघ अग्रलेख लिहून गुरगुरणार असेल तर मी वनमंत्री आहे. वाघाचे संवर्धन आणि संरक्षण करणं मला माहित आहे असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं होतं. सत्ता स्थापनेबाबत काही तोडगा निघाला नाही तर राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. यावर हा इशारा म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे, असे राऊत यांनी म्हटलं होतं. भाजपकडून सरकारी यंत्रणेचा वापर करून फोडाफोडीचे राजकारण : संजय राऊत   यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, आज ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, राष्ट्रपती राजवट अशा धमक्या दिल्या जात आहेत. मात्र आता महाराष्ट्रातील आता कुठल्याही पक्षाचा आमदार फुटणार नाही. सरकारी यंत्रणांचा वापर करून फोडाफोडीचे राजकारण यांनी केले आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. ते म्हणाले की, या राजकारणामुळे राज्यातील जनतेने विरोधात बंड केले आणि निकालाचे आकडे बदलले. शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्षाला विधानसभा निवडणुकीत मोठा आकडा मिळाला हे त्यांचंच फलित आहे. निवडणुकीआधी पाच आमदार ही निवडून येणार नाहीत असं चित्र तयार केलं गेलं होतं मात्र त्या पक्षाला आज पूर्वीपेक्षाही चांगल्या जागा मिळाल्या, असे ते म्हणाले. विशेषतः शरद पवारांबाबत ईडीची नोटीस प्रकरण घडायला नको होती, असेही ते म्हणाले. भाजपचं राज्यातील नेतृत्व फेल, दिल्ली हायकमांडचेही दुर्लक्ष, संजय राऊतांचा हल्लाबोल  दरम्यान 'हीच ती वेळ, आता नाहीतर कधी नाही' असे म्हणत शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असेही ते म्हणाले. तरुणांनी नेतृत्व केलं पाहिजे असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत ते स्वत: सकारात्मक असल्याचे संकेत दिले. मात्र मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय हा उद्धव ठाकरे हेच घेतील असेही त्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE: भूकंपानं महाराष्ट्र हादरला; हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात मध्यरात्री भूकंपाचे धक्के
Maharashtra Breaking LIVE: भूकंपानं महाराष्ट्र हादरला; हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात मध्यरात्री भूकंपाचे धक्के
Moshi Building Collapse: 'आत कचऱ्याची प्रचंड उष्णता, विषारी वायू अन्...'; मोशीत जवानांनी जीव धोक्यात घालून कसं केलं बचावकार्य? अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितला अंगावर काटा आणणारा थरार
'आत कचऱ्याची प्रचंड उष्णता, विषारी वायू अन्...'; मोशीत जवानांनी जीव धोक्यात घालून कसं केलं बचावकार्य? अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितला अंगावर काटा आणणारा थरार
Sanjay Raut on Devendra Fadnavis: 'जनतेला कुत्रे, भाडे के टट्टू म्हणता, तुम्हाला लाज वाटली पाहिजे'; देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर संजय राऊतांची घणाघाती टीका, म्हणाले, 'हे तर सुलतानाचे...'
'जनतेला कुत्रे, भाडे के टट्टू म्हणता, तुम्हाला लाज वाटली पाहिजे'; देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर संजय राऊतांची घणाघाती टीका, म्हणाले, 'हे तर सुलतानाचे...'
'कर्नाटक सरकार 40 टक्के कमिशन आणि 'पे सीएम' च्या एका घोषणेवर गेलं, महाराष्ट्रात त्यापेक्षाही भयानक परिस्थिती..' मिसिंग लिंक अन् सीएम फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर पृथ्वीराज बाबा काय काय म्हणाले?
'कर्नाटक सरकार 40 टक्के कमिशन आणि 'पे सीएम' च्या एका घोषणेवर गेलं, महाराष्ट्रात त्यापेक्षाही भयानक परिस्थिती..' मिसिंग लिंक अन् सीएम फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर पृथ्वीराज बाबा काय काय म्हणाले?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Trinamool Congress: सत्ता गेली, आमदार खासदार फुटले, आता ईडीने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या तीन खात्यांमधील तब्बल 440.42 कोटी रुपयांची रक्कम गोठवली
सत्ता गेली, आमदार खासदार फुटले, आता ईडीने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या तीन खात्यांमधील तब्बल 440.42 कोटी रुपयांची रक्कम गोठवली
'कर्नाटक सरकार 40 टक्के कमिशन आणि 'पे सीएम' च्या एका घोषणेवर गेलं, महाराष्ट्रात त्यापेक्षाही भयानक परिस्थिती..' मिसिंग लिंक अन् सीएम फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर पृथ्वीराज बाबा काय काय म्हणाले?
'कर्नाटक सरकार 40 टक्के कमिशन आणि 'पे सीएम' च्या एका घोषणेवर गेलं, महाराष्ट्रात त्यापेक्षाही भयानक परिस्थिती..' मिसिंग लिंक अन् सीएम फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर पृथ्वीराज बाबा काय काय म्हणाले?
Sairat Fame Actor Arbaz Shaikh Viral Video: तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
Anjali Damania on Devendra Fadnavis: अहंकार... फक्त आणि फक्त अहंकार; मिसिंग लिंकची दुर्दशा उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहत असताना “भाडे के टट्टू” म्हणणं शोभतं का मुख्यमंत्र्यांना? अंजली दमानियांचा हल्लाबोल
अहंकार... फक्त आणि फक्त अहंकार; मिसिंग लिंकची दुर्दशा उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहत असताना “भाडे के टट्टू” म्हणणं शोभतं का मुख्यमंत्र्यांना? अंजली दमानियांचा हल्लाबोल
Prithviraj Chavan on Missing Link: मिसिंग लिंकच्या कामात सुरक्षेबाबत तडजोड झालेय, महायुती सरकारच्या काळात कंत्राटदरांकडून 40 टक्के कमिशनचा पायंडा : पृथ्वीराज चव्हाण
मिसिंग लिंकच्या कामात सुरक्षेबाबत तडजोड झालेय, महायुती सरकारच्या काळात कंत्राटदरांकडून 40 टक्के कमिशनचा पायंडा : पृथ्वीराज चव्हाण
Iran War Live Update: इराणवर सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेच्या भीषण हवाई हल्ल्याने जगाच्या पाठीवर पुन्हा एकदा थरकाप; मार्केटला घरघर, इराणकडून बहरिन, कुवेतमधील एअरबेस टार्गेटवर
इराणवर सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेच्या भीषण हवाई हल्ल्याने जगाच्या पाठीवर पुन्हा एकदा थरकाप; मार्केटला घरघर, इराणकडून बहरिन, कुवेतमधील एअरबेस टार्गेटवर
Sanjay Raut and Sharad Pawar: ज्या गद्दाराने आपलं सरकार पाडलंय त्याच्या छताखाली जाऊन बैठका घेतल्याने मोठ्या नेत्यांची विश्वासार्हता कमी होते; संजय राऊतांकडून शरद पवारांवर शरसंधान
ज्या गद्दाराने आपलं सरकार पाडलंय त्याच्या छताखाली जाऊन बैठका घेतल्याने मोठ्या नेत्यांची विश्वासार्हता कमी होते; संजय राऊतांकडून शरद पवारांवर शरसंधान
Chanakya Niti: विवाहित महिलांनो, 4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा! नातं आयुष्यभर टिकवून ठेवण्यासाठी मदत होईल, चाणक्यनीती...
विवाहित महिलांनो, 4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा! नातं आयुष्यभर टिकवून ठेवण्यासाठी मदत होईल, चाणक्यनीती...
Embed widget