Sanjay Raut Meets Sharad Pawar: शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात आज बैठक झाली. या बैठकीत पोलीस निरीक्षक आशा कोकरे आणि नंदकुमार गोपाळ यांच्या अटकेबाबत चर्चा झाली. वसुली प्रकरणात सीआयडीने मोठी कारवाई करत आशा कोकरे आणि नंदकुमार गोपाल यांना अटक केलीय. सीआयडीने या दोघांना प्रथम चौकशीसाठी बोलावून घेतलं होतं. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आलीय, अशी माहिती समोर आलीय.


संजय राऊत यांनी शरद पवारांशी चर्चा करताना राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईबाबत वक्तव्य केलंय. या कारवाईमुळे राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खचून जातं, असेही त्यांनी म्हटलंय. याशिवाय, मुंबई पोलीस आयुक्त असताना अधिकाऱ्याने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे काम परमबीर सिंग करत होते, असे मत संजय राऊत यांनी शरद पवारांच्यासमोर व्यक्त केलंय.


दोन्ही अधिकाऱ्यांचे काम चांगले- संजय राऊत


दरम्यान, व्यापारी श्याम अग्रवाल यांच्या तक्रारीनंतर हे प्रकरण मुंबई पोलिसांकडून राज्य सीआयडीकडं वर्ग करण्यात आलं. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सीआयडी करतंय. सीआयडीने याप्रकरणी काल रात्री उशिरा मोठी कारवाई केलीय. मात्र, सीआयडीने अटक केलेल्या दोन अधिकाऱ्यांचे काम चांगलंय, असंही संजय राऊत यांनी म्हटलंय. संजय राऊतांच्या भेटीनंतर शरद पवार यांनी गृहराज्यमंत्री दिलीप वळसेपाटील आणि मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. 


हे देखील वाचा-