कोल्हापूर : महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांची निवडणूक जाहीर झाली आहेत. 10 डिसेंबर रोजी ही निवडणूक होणार असून मुंबईतील दोन जागासह कोल्हापूर, धुळे, नागपूर,अकोला विधान परिषद मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे. त्यामुळे आजपासून विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असं म्हणायला काही हरकत नाही. कोल्हापूर विधानपरिषद मतदारसंघाचा विचार केला तर विद्यमान आमदार आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासमोर उमेदवार कोण असा प्रश्न उपस्थित होतोय.

सध्यातरी राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासमोर कोणतंही कडवं आव्हान दिसत नाही. महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार म्हणून सतेज पाटील यांचं नाव नक्की झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सतेज पाटील यांनी निवडणुकीची तयारी देखील केली आहे.

गेल्या निवडणुकीत महादेवराव महाडिकांचा पराभव

2015 ला काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांनी काँग्रेसचेच बंडखोर आणि भाजपच्या पाठींब्यावर निवडणूक लढवलेले महादेवराव महाडिक यांचा 63 मतांनी पराभव केला होता. पाटील यांना 220, तर महाडिक यांना 157 मते मिळाली होती.

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेवर महाविकास आघाडीची पकड मजबूत आहे. त्यामुळे सतेज पाटील यांच्या विरोधात भाजपकडून कोणता उमेदवार रिंगणात उतरणार अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली आहे. सध्याच्या घडीला भाजपाकडून कोणत्याही उमेदवाराच्या नावाची चर्चा नाही. 

गेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीवेळी राज्यामध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते. अशावेळी भाजप पुरस्कृत असणाऱ्या महादेवराव महाडिक यांचा सतेज पाटील यांनी पराभव केला होता. आता तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे सतेज पाटील विधानपरिषदेची ही निवडणूक सहज जिंकतील अशा पद्धतीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच हसन मुश्रीफ यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीवरून विरोधकांना टोला लगावला होता. सतेज पाटील यांच्या विरोधात लढण्यासाठी विरोधकांकडे उमेदवारच नाही, अशा पद्धतीची टिप्पणी मुश्रीफ यांनी केली होती. यावर चंद्रकांतदादा पाटील यांना विचारले असता मुश्रीफांनी दुसर्‍यांच्या घरामध्ये वाकून पाहून आहे अशा पद्धतीचा टोला लगावला होता. त्यामुळे भाजप सतेज पाटील यांच्याविरोधात नेमका कोणता चेहरा उभा करतात हे पहावे लागणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील सध्याचं पक्षीय बलाबल

जयसिंगपूर 27 जागाशाहू आघाडी यद्रावकार गट -16ताराराणी भाजप 11

इचलकरंजी 62काँग्रेस 18भाजप 14राष्ट्रवादी 7कारंडे गट 9ताराराणी आघाडी आवडे गट 11शिवसेना 1

शिरोळ 17शाहू आघाडी (राष्ट्रवादी)10भाजप 6रिक्त-1

हुपरी 18भाजप 7ताराराणी गट(आवडे) 5मनसे 2  शिवसेना 2अपक्ष 2

आजरा 17भाजप 9राष्ट्रवादी-काँग्रेस 6अपक्ष 2

मलकापूर 17जनसुराज्य-भाजप-9राष्ट्रवादी-सेना 8

पन्हाळा 17जनसुराज्य 12स्थानिक आघाडी 5

मुरगुड 18शिवसेना 15राष्ट्रवादी 3

गडहिंग्लज 19जनता दल 12राष्ट्रवादी 6शिवसेना 1

पेठ वडगाव 17युवक क्रांती 13यादव आघाडी 4

कागल 20राष्ट्रवादी 9भाजप 9शिवसेना 2

चंदगड 17भाजप 5राष्ट्रवादी 2काँग्रेस 6शिवसेना 4

हातकणंगले 17भाजप 5शिवसेना 7काँग्रेस 1राष्ट्रवादी 1

महत्वाच्या बातम्या :