Sanjay Raut on Shinde Fadnavis Government : महाराष्ट्रात विधीमंडळ हे तर 'चोर'मंडळ, असं म्हणत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना गट (Shiv Sena) आणि भाजपवर (BJP) थेट निशाणा साधला आहे. बनावट शिवसेनेने पदावरुन काढलं तरी आम्ही पक्ष सोडणार नाही, असंही संजय राऊत यांनी बोलताना ठणकावून सांगितलं आहे. एकनाथ शिंदे म्हणतात बेळगाव प्रकरणी ते तुरुंगात गेले. त्यांनी त्याची कागदपत्रं दाखवावीत, असं आव्हानही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. यासोबतच सरकार बदलताच 28 चोरांना क्लीन चिट दिल्याचा आरोपही संजय राऊतांनी यावेळी केला आहे. 


संसदेत पक्षनेतेपदावरुन काढून टाकण्यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, "टाकू द्या. बनावट शिवसेना आहे, ड्युप्लिकेट. चोरांचं मंडळ... विधीमंडळ नाही 'चोर'मंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरुन काढलं तरी आम्ही पक्ष सोडणार नाही. अशी अनेक पदं आम्हाला पक्षाने, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी दिली. जी आम्ही ओवाळून टाकतो पक्षासाठी. आम्ही लफंगे नाही. पदं गेली तरी परत येतील, आमचा पक्ष महत्त्वाचा आहे." 


पाहा व्हिडीओ : Sanjay Raut on Kirit Somaiya : सरकारची आतापर्यंत 28 चोरांना क्लीन चिट



सरकारची आतापर्यंत 28 चोरांना क्लीन चिट, किरीट सोमय्यांनी कोट्यावधी रुपये कुठे ठेवलेत? : संजय राऊत 


संजय राऊत म्हणाले की, "INS विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली एका चोराने... किरीट सोमय्याने लाखो, कोट्यवधी रुपये गोळा केले... लोकांकडून... जाहीरपणे... आणि हे लाखो, कोट्यवधी रुपये आम्ही राजभवनात जमा करु विक्रांतच्या नावावर, असं त्यांनी सांगितलं होतं. हे पैसे कुठे गेले हे शेवटपर्यंत त्यांनी सांगितलं नाही. हे पैसे कुठे गेले याचा शेवटपर्यंत शोध लागला नाही. या प्रकरणाचा तपास याच तपासयंत्रणांकडून सुरु होता. मात्र, सरकार बदलताच या चोरांना क्लीन चिट देण्यात आली. असे या सरकारने तपास यंत्रणांच्या माध्यमातून 28 चोरांना क्लीन चिट देण्याचा उपक्रम राबवला आहे." 


कसब्याची जागा भाजपकडून जाईल : संजय राऊत 


पुण्यातील पोटनिवडणुकीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, "कसब्याची जागा मुळात आमच्याकडे नव्हतीच. ती जागा 30-35 वर्ष भाजपकडे होती. मात्र, यंदा ती भाजपाकडून जाते आहे. पिंपरीची जागा कोण जिंकेल, सांगता येत नाही. पण हा सुद्धा एकप्रकारे भाजपचा पराभव आहे." "कसबा आणि पिंपरीतल्या निवडणुका आपण हरतो आहे, हे लक्षात आल्यानंतर तिथे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी पोलिसी यंत्रणेचा गैरवापर सुरु केला आहे," असा आरोपही त्यांनी केला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


संजय राऊतांनी 'चोर'मंडळ म्हणताच सभागृहात हक्कभंग आणण्याची मागणी; भरत गोगावलेंकडून राऊतांना अपशब्द