Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या (MVA) फॉर्म्युल्यावर लवरकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मविआची मुंबईत दुपारी 12 वाजता बैठक होणार आहे. दरम्यान या बैठकीला वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत. आजच्या बैठकीत मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे. या बैठकीआधी प्रकाश आंबेडकर शरद पवारांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीआधी प्रकाश आंबेडकर काय बोलणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार आहे. ज्यात महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब करणार आहेत. बैठकीच्या आधी तिन्ही नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती आहे. ज्यात प्रकाश आंबेडकर हे शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. प्रकाश आंबेडकरांकडून आम्ही किमान सहा जागा जिंकू शकतो असं सांगितलं होतं. अकोल्याच्या जागेवर स्वत: प्रकाश आंबेडकर उभे राहणार आहेत.
मविआ जागावाटपाचा फॉर्मुला जाहीर होणार
महाविकास आघाडीचा जागावाटप अंतिम झालं असून आजच्या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्मुला जाहीर करणार असल्याचं सांगितलं जात आहे. महाविकास आघाडीच्या याआधीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीने जागा वाटप संदर्भात आपला प्रस्ताव महाविकास आघाडी समोर ठेवल्याची माहिती आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून 27 जागांचा प्रस्ताव
वंचित बहुजन आघाडीकडून 27 जागांचा प्रस्ताव समोर ठेवण्यात आला आहे, अशी माहिती आहे. यामध्ये वंचितच्या जागांवर महाविकास आघाडीकडून चर्चा झाली असून आजच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला जागा देण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असं सांगितलं जात आहे.
आज महत्त्वाची बैठक
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) या प्रमुख नेत्यांची आज बैठक पार पडल्यानंतरच राज्यातील महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) जागावाटप संदर्भातील फॉर्मुला मसुदा जाहीर केला जाईल.
MVA Meeting : पाहा व्हिडीओ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मविआची बैठक; प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार
महत्त्वाच्या इतर बातम्या :