Sanjay Rathore : 'त्या' प्रकरणाची चौकशी पूर्ण, माझ्यावरचे आरोप खोटे, यापुढे आरोप केले तर कायदेशीर मार्गाने उत्तर देणार: संजय राठोड
पोलिसांनी मला क्लीन चिट दिली असून यापुढे जर माझ्यावर आरोप झाले तर मी कायदेशीर मार्गाने उत्तर देणार असल्याचं राज्याचे मंत्री संजय राठोड म्हणाले.

बुलढाणा: एका युवतीच्या आत्महत्येच्या प्रकरणात मला पोलिसांनी क्लीन चिट दिली असून मी निर्दोष आहे, यापुढे माझ्यावर जर आरोप झाले तर कायदेशीर मार्गाने उत्तर देईन असं राज्याचे मंत्री संजय राठोड यांनी स्पष्ट केलं. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर आरोप करत त्यांचा मंत्रिमंडळातील समावेश हा दुर्दैवी असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर संजय राठोड यांनी ही प्रतिक्रिया दिली.
संजय राठोड आज माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, "ज्या प्रकरणात माझ्यावर आरोप झालेले आहेत त्यामध्ये माझी पोलिसांनी निर्दोष मुक्तता केली आहे. त्यानंतरच माझा नव्या मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. मलाही माझा परिवार आहे, मी अनेक वर्षे राजकारणात आहे. या प्रकरणात चित्रा वाघ यांना सगळ्या गोष्टींची माहिती नाही. त्यामुळे यापुढे जर माझ्यावर आरोप झाले तर मी कायदेशीर मार्गाने उत्तर देणार."
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानंतरच मी मंत्रीपदाची शपथ घेतली असंही संजय राठोड म्हणाले.
Before You Go
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
महत्त्वाच्या बातम्या





















