Lok Sabha Election 2024 : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघांमध्ये (Mumbai North West Lok Sabha Constituency) ठाकरे गटाकडून अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने महाविकास आघाडीत वादाला सुरवात झाली आहे. अमोल कीर्तीकर यांच्या उमेदवारीवरून काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेतृत्व शिवसेनेला सरेंडर झालं असून, आता माझ्यासमोर सर्व पर्याय खुले असतील. आठवड्याभरात मी मोठी घोषणा करू शकतो, आता आरपारची वेळ आली असल्याचे  निरुपम म्हणाले आहेत. 


शिवसेनेने आपले मुंबईतील उमेदवार घोषित केले आहेत. ज्यात सहा पैकी पाच ठिकाणी शिवसेना लढणार हे निश्चित झालंय. काँग्रेस पार्टीला खड्ड्यात घालण्याचे काम केले जात आहे. काँग्रेस पार्टीतून निगोशिएशन करणाऱ्या शिवसेनेचा निषेध करतो. शिवसेनेने ज्यांना उमेदवारी दिली आहे, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांनी खिचडी सप्लायरकडून दलाली घेतली आहे. अशा उमेदवाराला आमच्यावर थोपवलं आहे. मी खिचडी चोरचं काम करणार नाही, यासंदर्भात मी आत्ताच घोषणा करतोय, असे निरुपम म्हणाले. 


संजय निरुपम काय म्हणाले? 


माझ्या वरीष्ठ नेत्यांना आग्रह करतो की, शिवसेनेला यासंदर्भात जाब विचाराला हवा. आमच्या नेतृत्वाला काही चिंता वाटत नाही आहे. मला मागील 10 दिवसात कोणीही संपर्क केला नाही आणि विचारलं नाही. आपण काय करु शकतो. काँग्रेस कार्यकर्त्यांसोबतच न्याय होत नाही आहे. न्यायाच्या गप्पा मारणारे आपल्याच कार्यकर्त्यांवर अन्याय करतायत. माझा हक्क बनतो इथून लढण्याचा आणि आमचे नेतृत्व शिवसेनेला सरेंडर झालं. मी माझ्या नेतृत्वाला सांगू इच्छितो, माझ्याकडील सर्व पर्याय खुले असतील. एका आठवड्याहून अधिक वेळ मी नाही देऊ शकत. टफ निगोशिएटर आमचं नेतृत्व नव्हतं हे स्पष्ट दिसते आहे. आमच्या नेतृत्वाचं हे अपयश आहे हे मी मान्य करतोय. काँग्रेसला वाचवण्यात मुंबईतून आम्ही अपयशी झालोय हे दिसतंय. सांगलीची जागा त्यांनी घोषणा केली यावरुन स्पष्ट दिसतंय की काँग्रेसची त्यांना गरज नाही, असं निरुपम म्हणाले. 


काँग्रेस संपवण्याचा शिवसेनेचा अजेंडा दिसतोय...


शिवसेना एकट्याच्या दमावर लढू शकत नाही हे स्पष्ट दिसतंय. शिवसेनेने काँग्रेसच्या सीट ओढून घेतल्या आहेत. त्यांचा एक अजेंडा असेल ज्यात काँग्रेस संपवण्याचा त्यांचा विचार असेल. प्रकाश आंबेडकर वरीष्ठ नेते आहेत. मात्र, त्यांनी मोठ्या प्रमाणात जागांची मागणी केली. मात्र चर्चेवेळी देखील दिसतंय की त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं.  एका आठवड्यानंतर काय होणार हे तुम्हाला कळणारच आहे. मुंबईत एकवेळी पाच खासदार काँग्रेसचे असायचे. पण आता काँग्रेसचा मतदार कुठे जाणार? शिवसेनेकडे जाणार? मला संभ्रम आहे त्याबाबत. मी आवाहन करतोय तेव्हा माझे कार्यकर्ते देखील अमोल किर्तीकरचा प्रचार करणार नाहीत, असे निरुपम म्हणाले. 


पार्टीला वाचवायचं असेल तर युती तोडा 


मायग्रेट लेबर हा काँग्रेसचा मतदार आहे. त्यांच्या आयुष्यासोबत जो व्यक्ती खेळला आहे त्यांना मतदारदेखील मतदान करणार नाही. शिवसेना आणि काँग्रेसच्या युतीला मी आधीच विरोध केला होता. आता पाच वर्षांनंतर तेच दिसतंय. मात्र, आमचे काही नेते होते त्यांना सत्तेची मलाई खायची होती आणि हे घडलं. पार्टीला वाचवायचं असेल तर युती तोडा आणि मैदानात जाऊयात असेही निरुपम म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Amol Kirtikar Shiv Sena UBT Candidates :  इकडे ईडीची नोटीस, तिकडे लोकसभेचे तिकीट, अमोल किर्तीकर अखेर मैदानात