Sanjay Gaikwad On Sanjay Raut : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad ) यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. संजय राऊत रिकामटेकडे असून त्यांच्याकडे कोणतेही काम नाही, अशी टीका संजय गायकवाड (Sanjay Gaikwad ) यांनी केली आहे. मुंबईत रविवारी निघालेल्या मोर्चावर संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी टीकास्त्र सोडलं होतं. त्यावरुन संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
 
रिकामटेकड्या संजय राऊतांची दिवाळखोरी - 
संजय राऊत (Sanjay Raut)  हा एक रिकामटेकडा माणूस आहे. त्याच्याकडे कुठलेही काम नाहीये. मराठा समाजाच्या निघालेल्या लाखोंच्या मोर्चाला सुद्धा त्याने मुक्काम मोर्चा म्हणून टिंगल केली होती. सध्या राज्यात आणि देशांमध्ये जे हिंदू जन आक्रोश मोर्चे निघत आहेत, ते गोमातेच्या रक्षणासाठी आहेत. आतंकवाद्यांच्या सांगण्यावरून आपल्या देशामध्ये लव्ह जिहाद हैदोस घालतो आहे, लाखो मुलींचे धर्मांतर त्या ठिकाणी केले जातेय. त्याच्या विरोधात धर्मांतर बंदी कायदा आणण्यासाठी हे मोर्चे निघत आहेत. अनेक राज्यांनी हा कायदा लागू केला आहे. संपूर्ण देशात हा कायदा लागू करण्यात यावा. हा कायदा आपल्या हिताचा आहे. अशा मोर्चांवर टिंगल टवाळी करणं म्हणजे त्या हिंदुत्ववादी पक्षामध्ये काम करणाऱ्या संजय राऊतांची दिवाळखोरी निघाल्याचे दिसत आहे, असे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad ) म्हणाले. 


धनुष्यबाण हे चिन्ह बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच मिळेल - 


ऑन मेरिट खासदार आणि आमदारांची संख्या लक्षात घेता, निवडणूक आयोग धनुष्यबाण हे चिन्ह बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच देईल. कारण निवडणूक आयोगाने या वादावर तोडगा काढण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना हे एक नाव, प्रबोधनकार ठाकरेंची शिवसेना हे दुसरं नाव आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तिसरं नाव अशा तीन नावांपैकी ठाकरे गटाला सांगितलं की, तुम्हाला कुठलं नाव चालतं...? त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना घेतलं नाही. त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे नाव घेतलं, आणि धनुष्यबाण हे जे चिन्ह घेतलं होतं ते बाळासाहेबांनी घेतलं होतं. ती बाळासाहेबांची शिवसेना आम्हाला भेटल्यामुळे त्यांना त्या चिन्हावर हक्क सांगायचा अधिकार नाही. म्हणून धनुष्यबाण हे चिन्ह आम्हालाच मिळणार आहे, असे संजय गायकवाड (Sanjay Gaikwad )  म्हणाले.  


इतर महत्वाच्या बातम्या