Amit Thackeray in Kolhapur : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे (Amit Thackeray in Kolhapur) आज कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. आज सायंकाळी सात वाजता शासकीय विश्रामगृहावर अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.
उद्या मंगळवारी अमित ठाकरे (Amit Thackeray in Kolhapur) सकाळी अंबाबाई दर्शन घेणार आहेत. त्यानंतर न्यू कॉलेज आणि विवेकानंद कॉलेज परिसरातील विद्यार्थी सेनेच्या शाखेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी 11 वाजता इंजिनिअरींग असोशिएशनच्या सभागृहात महासंपर्क अभियानांतर्गत विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा त्यांच्या उपस्थितीत होईल. सायंकाळी शाहू स्टेडियम येथे होणाऱ्या फुटबॉल सामन्याला ते उपस्थित राहणार आहेत. याशिवाय राजर्षी शाहू महाराज यांचे जन्मस्थळ, मोतीबाग तालीम याठिकाणीही ते भेट देणार आहेत.
अमित ठाकरेंनी घेतली उदयनराजेंची भेट
अमित ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाच्या विस्तारासाठी राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल सातारमध्ये छत्रपती शिवरायांचे थेट वंशज खासदार उदयनराजे भोसले (Amit Thackeray Meets Udayanraje Bhosale in Satara) यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत उदयनराजे यांनी दिलखुलास स्वागत करताना आपल्या खास मित्राचा मुलगा घरी आल्याने आपलाच मुलगा घरी आल्यासारखं वाटल्याचे त्यांनी सांगितले.
उदयनराजे म्हणाले, तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे
उदयनराजे म्हणाले की, केवळ अमित ठाकरे नव्हे, तर इतर तरुणांनीही राजकारणात आलं पाहिजे. त्यांच्या माध्यमातून लोकांची सेवा केली पाहिजे. ठाकरे कुटुंबाला प्रबोधनकारांपासून वारसा आहे. ठाकरे घराण्याचा इतिहास मोठा आहे. प्रबोधनकार ठाकरे असतील, बाळासाहेब असतील, राज ठाकरे असतील, या सर्वांचा नावलौकिक त्यांनी केला पाहिजे. ती त्यांची जबाबदारी आहे. त्यांची फॅन फॉलोईंग जोरात असल्याचे ते म्हणाले. माझ्या अमितसाठी सदिच्छा असून त्याच्या हातून मोठं कार्य होऊदे असेही उदयनराजे म्हणाले.
महत्वाच्या इतर बातम्या :