एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
धनगर आरक्षणासाठी सांगलीत मेळावा, जानकरांसह राम शिंदे उपस्थित
सांगली: मराठा समाजापाठोपाठ धनगर समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. आज सांगलीतल्या आरोवाडीमधील बिरोबाच्या वनात भव्य दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं.
या कार्यक्रमाला जलसंपदामंत्री राम शिंदे, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर आणि धनगर समाजाचे नेते हजर आहेत.
या आंदोलनात साधारण 2 लाख लोक सहभागी होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मराठा आरक्षणासाठी राज्यभरात विक्रमी संख्येने मोर्चे निघाल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणासाठी पाठिंबा दिला आहे. कालच भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीतही मराठा आरक्षणासाठीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मार्चच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाला साकडं घालून जेजुरी गड ते विधानभवन अशी बाईक रॅली काढण्यात आली होती. तसेच यासाठी आझाद मैदानावरही आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातून धनगर समाजातील बांधव उपस्थित झाले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बॉलीवूड
निवडणूक
राजकारण
Advertisement