एक्स्प्लोर

इस्लामपुरात पोलिसांचा 'सिंघम' अवतार, गुंडांची भर रस्त्यावरुन धिंड काढली

शहरातील गुंडगिरीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी उचललेल्या या पावलाचे सामान्य नागरिकांमधून स्वागत होत आहे. इस्लामपूरचे पोलीस निरीक्षक विश्वास साळोखे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

सांगली : इस्लामपूर शहरात वाढवणाऱ्या गुंडगिरीला पोलिसांकडून चांगलाच धडा शिकवला. भरदिवसा धारदार शस्त्र दाखवत संपूर्ण शहरात दहशत माजवणाऱ्या गुंडांची  इस्लामपूर पोलिसांनी शहरातील प्रमुख मार्गावरून धिंड काढली. व्यापाऱ्यांना खंडणी मागणाऱ्या टोळक्याची पोलिसांनी दहशत मोडीत काढली आहे. इस्लामपूरमध्ये दहशत पसरवणाऱ्या 8 जणांना पोलिसांनी केली अटक आहे. दहशत माजवणारे टोळके हे नशा करून गुन्हे करत असल्याचे समोर आले होते. इस्लामपूर शहरातील सर्वच मेडिकल दुकानदारांनी नशेच्या गोळ्या ठेवू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहरात काही दिवसांपासून गुंडांनी हैदोस घातला होता. भरदिवसा धारदार शस्त्र दाखवत संपूर्ण शहरातून दहशत माजवत व्यापाऱ्यांना खंडणी मागणे असे अनेक प्रकार सर्रासपणे घडत होते. या गुंडगिरीने पोलीस प्रशासनासमोर आव्हान उभे राहले होते. शहरातील व्यापाऱ्यांनी अनेकदा तक्रारीही केल्या होत्या. या तक्रारीवरून चार दिवसांपासून पोलिसांनी राजकीय वरदहस्त डावलून गुंडांची पाळेमुळे खणण्यास सुरुवात केली आणि दहशत माजवणाऱ्या गुंडांना पकडून शहरातून धिंड काढत दहशत मोडीत काढली. खंडणीची मागणी करत व्यावसायिक जितेंद्र परदेशी यांच्यावर खूनी हल्ला प्रकरणी गुंड सोनम शिंदे, मुज्जमिल शेख, नितीन पालकर व जयेश माने या चौघांच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ करण्यात आली आहे. या सर्व आरोपींना काल  घटनास्थळावर नेताना इस्लामपूर पोलिसांनी शहरातील प्रमुख मार्गावरून धिंड काढली. आरोपींची धिंड पाहण्यासाठी इस्लामपूर शहरातील हजारो नागरिक जमा झाले होते. शहरातील गुंडगिरीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी उचललेल्या या पावलाचे सामान्य नागरिकांमधून स्वागत  होत आहे. इस्लामपूरचे पोलीस निरीक्षक विश्वास साळोखे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
Kolhapur Crime: आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर अवैध गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
Tukaram Mundhe : हायकोर्टाने कारवाईबाबत प्रश्न विचारले, आज तुकाराम मुंढेंचं पथक थेट कोर्टाच्याच कँटिनमध्ये पोहोचलं, नोंदच नसल्याचं उघड!
हायकोर्टाने कारवाईबाबत प्रश्न विचारले, आज तुकाराम मुंढेंचं पथक थेट कोर्टाच्याच कँटिनमध्ये पोहोचलं, नोंदच नसल्याचं उघड!
Embed widget