सांगली : महापालिकेत सत्तेत असूनही लाज वाटेल असं काम शहरात झालंय. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीने काढलेला आश्वासननामा नसून तो झूठनामा आहे, अशी टीका शिवसेनेचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन समोर झालेल्या सभेत एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी खासदार गजानन कीर्तिकर, नितीन बानगुडे पाटील आणि शिवसेनेचे जिल्ह्यातील नेते उपस्थित होते.
यावेळी शिंदे यांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मतदानादिवशी मतदान करताना लक्ष ठेवा, मशीनचे क्रमांक लक्षात ठेवा, शिवसेनेला मतदान होतेय का हे पाहा असा सल्ला देखील मतदारांना दिला.
सांगली महापालिकेसाठी एक ऑगस्ट रोजी मतदान होत आहे. त्यामुळे प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप आणि शिवसेना या निवडणुकीत स्वतंत्र लढत असल्याने दोन्ही पक्षांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीचा आश्वासननामा नाही, झूठनामा : एकनाथ शिंदे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Jul 2018 10:40 PM (IST)
सांगली महापालिकेसाठी एक ऑगस्ट रोजी मतदान होत आहे. त्यामुळे प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप आणि शिवसेना या निवडणुकीत स्वतंत्र लढत असल्याने दोन्ही पक्षांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -