पुणे : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असतानाच आता धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. पुढील धोरण ठरवण्यासाठी 5 ऑगस्टला पुण्यात कृती समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये धनगर समाजातील सर्वपक्षीय नेते उपस्थित असतील.
धनगर समाजातील सर्वपक्षीय नेते, आजी-माजी आमदार-खासदार आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीचं आमंत्रण देण्यात आलं आहे. धनगर समाजाचा समावेश आदिवासींमध्ये करण्यात यावा ही प्रमुख मागणी असेल. बारामतीमधील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत 5 ऑगस्टला बैठक बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न गाजत आहे. यासाठी राज्यभर मराठा मोर्चाकडून आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. आजच लातूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाने बैठक घेऊन 1 ते 9 ऑगस्टदरम्यान राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं.
दुसरीकडे मुस्लीम आरक्षणाचं काय, असा सवाल एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला. मराठा समाजाचे, धनगर समाजाचे आमदार जास्त असल्यामुळे आरक्षणाचा प्रश्न मांडतात, पण मुस्लीम आरक्षणाचं काय, असं प्रश्न जलील यांनी काल मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत उपस्थित केला.
आरक्षणासाठी धनगर समाजही आक्रमक, 5 ऑगस्टला पुढचं धोरण ठरवणार!
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
Updated at:
29 Jul 2018 08:01 PM (IST)
पुढील धोरण ठरवण्यासाठी 5 ऑगस्टला पुण्यात कृती समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये धनगर समाजातील सर्वपक्षीय नेते उपस्थित असतील.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -