Sangli Flood:संततधार पावसामुळेकृष्णा नदीच्या (Sangli Krushna River) पाणीपातळीत वाढ झाली आहे. सोबतच आज कोयनेतून विसर्ग (Koyna Dam)वाढवण्यात येणार आहे. त्यामुळं कृष्णा नदीला पूर येण्याची शक्यता आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने महापालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट आदी भागातील नागरिकांना स्पीकरवरून स्थलांतर होण्याच्या सूचना देण्यात आल्या. 


कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. शिवाय कोयना धरणातून विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे सांगली येथील आयर्विन नदीच्या पाण्याची पातळी 27 फुटांवर गेली आहे. महापालिका प्रशासनाकडून खबरदारी आणि स्थलांतराबाबत जागृती सुरू करण्यात आली आहे. नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर होण्याच्या सूचना मनपा प्रशासनाकडून स्पीकरवरून दिल्या जात आहेत. सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉटसह सिध्दार्थ परिसर, मगरमच्छ कॉलनी परिसरातील नदीकाठचा भागातील नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा


कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पर्जन्य आवक वाढल्याने पूर्वनियोजनानुसार आज सकाळी 10 वाजता कोयना धरणाचे वक्रदरवाजे 1 फुट 6 इंच उघडून 8000 क्यूसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे. धरण पायथा विद्युत गृहामधून 2100 क्युसेक्स विसर्ग चालू असलेने कोयना धरणातून नदीपात्रात एकूण 10100 क्यूसेक विसर्ग सुरू राहणार आहे. त्यामुळे कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


चांदोली धरणातून 3000 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा..


शिराळा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने चांदोली धरणाचे चार वक्राकार दरवाजे उचलून पाणी सांडव्यातून 1300 तर विद्युत निर्मितीतून 1700 असे एकूण 3000 क्यूसेक्सने वारणा नदीत पाणी सोडले जात आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन लागली आहे. वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले. कोकरूड-रेठरे बंधारा पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद झाली. मुसळधार पावसाचे प्रमाण वाढल्यास आणखी विसर्ग वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. चांदोलीच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने धरणाचे चारही दरवाजे सोमवारी खुले इशारा धरण प्रशासनाने दिला आहे.



महत्त्वाच्या बातम्या:


Almatti Dam : 'अलमट्टी'तून दोन लाख क्युसेकने विसर्ग सुरु, कोयना धरणात 24 तासात 4.97 टीएमसी पाण्याची वाढ


Koyna Dam : कोयना धरण पायथा विद्युत गृहातून 2100 क्युसेकने पाण्याचा विसर्ग कोयना नदीत होणार