एक्स्प्लोर
आर्चीला पाहण्यासाठी चाहते 'सैराट', कराड-सोलापूर वाहतूक बंद

सांगली : 'सैराट' सिनेमातील आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरुची क्रेझ अद्यापही कमी झालेलं नाही. बीडपाठोपाठ आता सांगलीच्या विट्यामध्ये याचा प्रत्यय आला. एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी विट्यामध्ये पोहोचलेल्या रिंकूला पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती.
आर्चीची एक झलक पाहण्यासाठी चाहते सैराट झाले आहेत. हे हॉटेल कराड-सोलापूर रस्त्यावर असल्याने हा रस्ताही गर्दीने फुलून गेला आहे. हा रस्ता बंद करुन वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
दरम्यान, रिंकू राजगुरुला पाहण्यासाठी झालेली गर्दी आवरताना पोलिसांच्या नाकीनऊ आले. पोलिसांनी उपस्थित चाहत्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. इतकंच नाही तर हुल्लडबाजी केल्यास लाठीमार करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
आशिया कप 2022
पुणे
हिंगोली
Advertisement
Advertisement



















