सांगली : सांगली शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीनेच पत्नीचा निघृण खून केल्याची घटना घडली आहे. शहरातील विजयनगर येथील शाहूनगरमध्ये ही घटना घडली आहे. चरित्र्याच्या संशयावरुन हा खून झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. हे दाम्पत्य सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील आहे. शिलवंती पिंटू पाटील (वय 40) असं मृत झालेल्या महिलेचं नावं आहे. याप्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चरित्र्याचा संशयावरुन जबर मारहाण केल्यानं महिलेचा मृत्यू
दरम्यान, या घटनेनंतर संशयिताच्या शोधासाठी सोलापूर जिल्ह्यात पथके पाठवण्यात आली आहेत. शिलवंती पिंटू पाटील (वय 40) असे मृत महिलेचे नाव आहे. तर पिंटू तुकाराम पाटील (वय 36) असे संशयित पतीचे नाव आहे. पाटील दाम्पत्य गेल्या काही महिन्यांपासून सांगलीतील शाहूनगर येथे रहात होते. हे दाम्पत्य मजुरीसाठी सांगलीत आले होते. त्यांना 9 आणि 7 वर्षांची दोन मुले आहेत. या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून तसेच पिंटू शिलवंतीवर चरित्र्याचा संशय घेत असल्यामुळे भांडण होत होती. मंगळवारी रात्रीही त्यांच्यात भांडण झाले होते. शिलवंती झोपल्यानंतर पिंटूने लाकडी दांडक्याने तिच्या डोक्यात जबर मारहाण केली. ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर तो मुलांना घेऊन तेथून निघून गेला. बुधवारी घटनेची माहिती मिळताच संजयनगरचे पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्यासह एलसीबीच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. हा खून पिंटूने केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांची पथके त्याच्या शोधासाठी सोलापूर जिल्ह्यात पाठवण्यात आली आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Haryana Murder: प्रियकरासोबत बायकोला नको त्या अवस्थेत पाहिलं; ओढणीच्या सहाय्याने पतीलाच संपवलं, मध्यरात्री दुचाकीवरती घेऊन फिरले अन्...