चंदीगड: हरियाणातील भिवानी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रवीना नावाच्या एका महिला युट्यूबरने तिच्या प्रियकरासह तिच्या पतीची हत्या केली. हत्येनंतर दोघे तो मृतदेह दुचाकीवरती घेऊन फिरले, त्यानंतर त्यांनी मृतदेह नाल्यात फेकून दिला. पोलिस तपासात असे दिसून आले आहे की, युट्यूबर रवीनाने इंस्टाग्रामद्वारे सुरेशशी संपर्क साधला होता. सुरुवातीच्या ओळखीनंतर, दोघांनीही एकत्र छोटे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. नवऱ्याला याची कल्पना आली होती. या घटनेने मेरठच्या सौरभ हत्याकांडाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. रवीनाचा बॉयफ्रेंड सुरेश देखील एक युट्यूबर आहे.

दोघेही आक्षेपार्ह स्थितीत सापडले

भिवानी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला युट्यूबरचा पती हिसारचा रहिवासी आहे. सुरेशने सांगितले की, प्रवीणने त्याला रवीनासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिले होते. सुरेशच्या म्हणण्यानुसार, यानंतर प्रवीणने रवीनाशी भांडण सुरू केले आणि दोघांनी मिळून बेडवर असलेल्या तिच्या ओढणीने त्याचा गळा दाबून खून केला. पोलिस चौकशीत असे उघड झाले की, पती प्रवीणच्या हत्येनंतर रवीना दिवसभर व्यवस्थित राहिली. संध्याकाळीही जेव्हा कुटुंबातील सदस्यांनी त्याला प्रवीणबद्दल विचारले तेव्हा तिने माहित नसल्याची बतावणी केली. रात्री उशिरा, मध्यरात्री 2.30 च्या सुमारास, जेव्हा सर्वजण झोपले होते, तेव्हा रवीना आणि सुरेश यांनी मृतदेह दुचाकीच्या मध्यभागी ठेवला आणि सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या दिन्नोड रोड नाल्यात फेकून दिला.

हत्येचा खुलासा कसा झाला?

28 मार्च रोजी, प्रवीणचा मृतदेह सदर पोलिसांना दिन्नोड रोडवरील एका नाल्यात कुजलेल्या अवस्थेत आढळला. यानंतर, जेव्हा पोलिसांनी अधिक तपास केला. प्रवीणचा मृतदेह तिथे कसा पोहोचला याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा त्याच्या घराजवळ हेल्मेट घातलेल्या एका संशयिताची दुचाकी दिसली. रवीनाही मागे बसली होती आणि तिचा चेहरा कापडाने झाकलेला होता आणि प्रवीणचा मृतदेह मध्यभागी होता. रात्री 2.30च्या सुमारास सीसीटीव्हीमध्ये दुचाकी जाताना दिसली. सुमारे दोन तासांनंतर, ती हेल्मेट घालून दुचाकीस्वाराच्या मागे बसून घरी परतली. पोलिसांनी त्यांची कडक चौकशी केली असता, दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला. रवीनाने रवीना रावच्या नावाने युट्यूबवर एक चॅनेल तयार केले आहे.

सहा वर्षांच्या मुलानं वडील गमावले

रवीनाच्या प्रेमप्रकरणामुळे एका सहा वर्षांच्या मुलाने आपल्या वडिलांना गमावले. आई रवीना हत्येच्या गुन्ह्यात तुरुंगात गेल्यानंतर, त्याला त्याच्या आईच्या प्रेमापासून आणि ममतेपासूनही दूर नेण्यात आले. मुकुल आता त्याचे आजोबा सुभाष आणि काका संदीप यांच्यासोबत राहत आहे. रवीनाचे इंस्टाग्रामवर 34000 हून अधिक फॉलोअर्स आहेत. कुटुंबातील सदस्यांच्या मते, रवीना सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. रवीनाने अनेक छोटे व्हिडिओ पोस्ट केले आहेत. यापैकी काही नृत्याशी संबंधित आहेत.

मध्यरात्रीच्या सुमारास मृतदेह बाईकवरून नेला

रवीना राव असं तिचं नाव असून पती प्रविणची हत्या केल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास मृतदेह बाईकवरून नेला. यासाठी तिला प्रियकर सुरेशनं मदत केली. घरापासून दूर 6 किमी अंतरावर एका नाल्यात मृतदेह फेकून देण्यात आला होता. युट्यूबर रवीनाला तिचा पती प्रविणने प्रियकर सुरेशसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं होतं. यानंतर रविना आणि तिच्या प्रियकराने प्रविणचा गळा ओढणीने आवळला. कुटुंबियांनी प्रविणबद्दल विचारताच आपल्याला काही माहिती नसल्याचं सांगत रविनाने नाटक केलं.

रविनाने पतीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर प्रियकराच्या मदतीने मृतदेह फेकून दिला. तिला ६ महिन्यांचा मुलगा असून तो आजोबा आणि काकांकडे राहतो. रविना आणि सुरेश यांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. दोघांनी एकत्र काही शॉर्ट व्हिडीओसुद्धा शूट केले होते. पती प्रविणसह कुटुंबियांनी यावर आक्षेप घेतला. मात्र तरीही जवळपास दीड वर्षे दोघेही एकत्र कंटेंट तयार करत होते.