एक्स्प्लोर

झोपडीत 3 कोटी, जामीनावर सुटलेला मैनुद्दीन पळाला

सांगली: मिरजमध्ये झोपडीत 3 कोटी सापडल्याप्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. कारण याप्रकरणातला आरोपी मैनुद्दीन मुल्ला 70 लाख रुपये घेऊन पसार झाला आहे.   एका झोपडीत 3 कोटी सापडल्यानं मैनुद्दीनला पोलिसांनी अटक केली होती. मात्र 20 दिवसांपूर्वी त्याची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर मैनुद्दीनं त्याचा साथीदार विनायक जाधव याच्याकडे ठेवलेले 70 लाख रुपये घेतले आणि तो पसार झाला आहे.   याप्रकरणी पोलिसांनी विनायक जाधव आणि मैनुद्दीनच्या पत्नीला अटक केली आहे.   झोपडपट्टीत 3 कोटी   काही दिवसांपूर्वी मिरजमधील मासेविक्रेता मैनुद्दीन मुल्लाच्या घरावर पोलिसांनी छापा घातला होता. या छाप्यात तीन कोटींपेक्षा अधिक रक्कम पोलिसांना सापडली होती.   मात्र, मैनुद्दीनकडे इतकी रक्कम कुठून आली, याचं कोडं सर्वाना पडलं होतं. पोलिस चौकशीतही मैनुद्दीनने खोटी माहिती दिली होती. ही रक्कम कर्नाटकातील एका खासदाराच्या गाडीतून चोरली असल्याचं सांगितलं होतं. मात्र पोलिसांनी अधिक तपास केला असता, मैनुद्दीनने हे पैसे कोल्हापूरच्या वारणानगरमधील बिल्डर झुंजार सरनोबत यांचे चोरल्याचं समोर आलं होतं.   काय होतं हे प्रकरण? मैनुद्दीन मुल्लाची नेमकी पार्श्वभूमी काय आहे?   सांगलीतल्या बैथलेहेम नगरात घबाड मिळालं. लाख दोन लाखांचं नाही, तर तब्बल 3 कोटींचं आणि तेही झोपडीतून.   मैनुद्दीन मुल्ला, चाळीशीतला इसम, ज्याचे खाण्याचे वांदे होते, तो अचानक बुलेट घेऊन फिरु लागला, पण हीच चंगळ त्याच्या अंगलट आली.   गस्तीवर असलेल्या पोलिसांना संशय आला, त्यांनी चौकशी केली असता मैनुद्दीनकडून दीड लाख हस्तगत केले. अधिक चौकशी करताना त्याच्या घरात 3 कोटी असल्याचं समोर आलं.   मग काय… सांगली पोलिसांची फौज त्याच्या घरात दाखल झाली आणि घरातला खजाना पाहून सगळ्यांचेच डोळे भिरभिरले. पाहावं तिकडे पैसे, बॉक्समध्ये पैसे, गादीखाली पैसे, पैसेच पैसे, नोटा मोजून मोजून बँकवालेही घामाघूम.   पण मैनुद्दीन नक्की कोण आहे? याचा तपास घेताना त्याच्या मूळ गावाचा शोध लागला. कोल्हापुरातल्या पन्हाळा तालुक्यातल्या जाखल्याशी त्याचं नातं आहे.  ख्रिश्चन मुलीशी लग्न केल्यानंतर 20 वर्षांपूर्वी जो तो गायब झाला, तो दिसलाच नाही.   मैनुद्दीनच्या या अकल्पित खजान्यानं गावकऱ्यांचेही डोळे विस्फारले.  मैनुद्दीनची परिस्थिती अत्यंत बिकट होती, त्यांच्याकडे इतका पैसा कुठून आला? असा प्रश्न गावकऱ्यांना पडला.

संबंधित बातम्या

सांगलीतील झोपडीत सापडलेल्या तीन कोटीचं गूढ उकललं

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
KDMC Hospital Health: चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
KDMC Hospital Health: चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Pune Nashik Highway Accident: भीषण अपघात! भरधाव कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या ट्रकला धडकला; पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प; पुणे-नाशिक महामार्गावरील घटना
भीषण अपघात! भरधाव कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या ट्रकला धडकला; पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प; पुणे-नाशिक महामार्गावरील घटना
Chhaya Kadam On Hindi Bigg Boss: मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
Bollywood Actor Pradeep Rawat Struggle Stroy: 'महाभारत'मुळे मिळाली ओळख, 'गजनी'मुळे बनले स्टार; 40 वर्षांची कारकीर्द अन् 100 हून अधिक सिनेमे; प्रदीप रावत यांचा अश्वत्थामापासून सुपरस्टार व्हिलनपर्यंतचा प्रवास
'महाभारत'मुळे मिळाली ओळख, 'गजनी'मुळे बनले स्टार; 40 वर्षांची कारकीर्द अन् 100 हून अधिक सिनेमे; प्रदीप रावत यांचा अश्वत्थामापासून सुपरस्टार व्हिलनपर्यंतचा प्रवास
Embed widget