एक्स्प्लोर
कृष्णा नदी पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु
मगरीच्या हल्ल्यानंतर आरडाओरडा सुरु झाल्याने ग्रामस्थांनी नदीकाठी धाव घेतली. परंतु तोपर्यंत मगर त्याला पाण्यात घेऊन गेली होती.

सांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने ओढून नेलेल्या 14 वर्षीय मुलाच्या शोधमोहीमेला आज पहाटेपासून पुन्हा सुरुवात झाली. वनविभाग पाच बोटींच्या सहाय्याने मुलाचा शोध घेत आहे. पलूस तालुक्याच्या ब्रह्मनाळ गावातील कृष्णा नदीच्या पात्रात शुक्रवारी (20 एप्रिल) संध्याकाळी सहाच्या सुमारास काही मुलं पोहत असताना, अचानक एका मगरीने सागर डंक नावाच्या मुलावर हल्ला करत त्याला पाण्यात ओढून नेलं. सागर हा मूळचा बेळगाव इथला असून तो आपल्या मामाच्या गावी सध्या आला होता. मगरीच्या हल्ल्यानंतर आरडाओरडा सुरु झाल्याने ग्रामस्थांनी नदीकाठी धाव घेतली. परंतु तोपर्यंत मगर त्याला पाण्यात घेऊन गेली होती. कृष्णा नदी पात्रात मगरीने 14 वर्षाच्या मुलाला ओढलं शोधमोहीम रात्री उशिरापर्यंत सुरु होती, पण त्यात यश आलं नाही. त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज पहाटेपासून पुन्हा सांगलीतील कृष्णा बोट क्लबच्या मदतीने शोध सुरु केला आहे. दरम्यान, ब्रह्मनाळ गावातील नागरिकांनी सकाळपासून नदीकाठी मोठी गर्दी केली आहे. पाहा व्हिडीओ
Before You Go
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















