Maharashtra Samruddhi Mahamarg : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग सुरु होऊन आज 100 दिवस पूर्ण झाले आहेत. या 100 दिवसांत समृद्धी महामार्गावर तब्बल 900 अपघात झाले आहेत. या अपघातामध्ये 31 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. तर काही अपघातामध्ये वन्यप्राण्यांनाही दुखापत झाली आहे. बहुतांश वन्यप्राण्यांना वाहनाची धडक लागल्याने त्यांचा जीवही गेला आहे.  समृद्धी महामार्गावर 100 दिवसात दररोज सरासरी 9 छोट्या मोठ्या अपघाताची नोंद झाली आहे. त्यामुळे हा समृद्धी महामार्ग की अपघातांचा रनवे अशी म्हणायची वेळ आली आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 डिसेंबर 2022 रोजी नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले होते. हा महामार्ग सुरु होऊन आज 100 दिवस झाले. या कालावधीत महामार्गावर छोटे मोठे 900 अपघात झाले. धक्कदायक बाब म्हणजे 46 टक्के अपघात हे मेकँनिक ब्रेक डाऊन झाल्यामुळे झाल्याचं समोर आले आहे. तर 15 टक्के अपघात टायर पंक्चरमुळे झाल्यामुळे झाले. तर 12 टक्के अपघात टायर फुटल्याने झाले आहेत. तर काही अपघातामध्ये वन्यप्राण्यांनाही दुखापत झाली आहे. बहुतांश वन्यप्राण्यांना वाहनाची धडक लागल्याने त्यांचा जीवही गेला आहे. त्यामुळे या महामार्गावरील वन्यप्राण्यांचा वावरबाबत निर्णय घेण्याची गरज आहे. 


समृद्धीवर महामार्गाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाल्यावर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला देखील करण्यात आला. मात्र हा महामार्ग अपघातांच्या मालिकेने चर्चेत आला आहे. इंधन संपल्यानंतर वाहने रस्त्याच्या कडेवर उभी राहिल्याने किंवा चालत्या गाडीत इंधन संपल्यानंतर गाडी बंद झाल्याने ही अपघात झाल्याचे परिवहन विभागाच्या तपासणीत समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळला महत्वाच्या सूचना केल्या आहेत.   


अपघात टाळण्यासाठी काय करायला हवं? याबाबत तज्ज्ञांनी खालील सूचना दिल्या आहेत. 


1) वेगाचे उल्लंघन करणार्‍या ,लेन शिस्त न पळणार्‍या, टायर बाबत माहिती साठी वाहन चालकासाठी  8 ठिकाणी समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येणार  आहेत. 
2) रस्ता सुरक्षा बाबत  माहिती देणारे फलक अधिक प्रमाणात लावणे 
3) सर्वे टोल नाक्यावर PA system सुरू करणे करणे 
4) truck चालकांची विश्रांतीची पार्किंग ची व्यवस्था निर्माण करणे


दुचाकीचा वावर...