मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर एकामागोमाग एक आरोप केले. आता त्याच नवाब मलिकांविरोधात वानखेडेंचे कुटुंब सरसावल्याचं दिसतंय. समीर वानखेडे यांच्या आत्या गुंफाबाई गंगाधर भालेराव यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात औरंगाबाद न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये नवाब मलिकांवर अॅस्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. 


गेल्या दीड-दोन महिन्यांपासून नवा मलिक आणि समीर वानखेडे यांच्यातील वाद काही थांबायला तयार नाही. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे प्रकरणात आता त्यांच्या आत्यांनी एंट्री केली आहे. वानखेडे यांच्या आत्या गुंफाबाई गंगाधर भालेराव यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात अखेर औरंगाबाद न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. 


औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात नवाब मलिक यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची तक्रार त्यांनी दिली होती. सीआरपीसी 156/3 अंतर्गत पोलीस गुन्हा दाखल करत नसल्याने त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचं सांगितलं. त्यांनी जिल्हा न्यायालयात आपल्या वकिलामार्फत नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आता मलिक आणि वानखेडे यांच्या वादात कोर्ट काय निर्णय घेतं याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे .


वानखेडेंच्या चुलत भावाने दाखल केला अॅस्ट्रॉसिटीचा गुन्हा
समीर वानखडे यांचे चुलत भाऊ संजय वानखेडे यांनी वाशिम न्यायालयात नवाब मलिक यांच्यावर अॕट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली होती. त्याअंतर्गत न्यायालयाने नवाब मलिक यांनी 13 डिसेंबरला हजर राहून बाजू मांडावी असा आदेश दिला. 


संबंधित बातम्या :