वाशिम : एनसीबीचे अधिकारी समीर वानखडे आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचा वाद आता थेट वाशिमच्या न्यायालयात जाऊन  पोहचला आहे. नवाब मलिक यांनी गेल्या काही दिवसांपासून  समीर वानखडे यांच्या जातीबद्दल केलेलं वक्तव्य आता त्यांना भोवल्याचं दिसतंय. समीर वानखडे यांचे चुलत भाऊ संजय वानखेडे यांनी न्यायालयात मलिक यांच्यावर अॕट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली होती. त्याअंतर्गत न्यायालयाने नवाब मलिक यांनी 13 डिसेंबरला हजर राहून बाजू मांडावी असा आदेश दिला. 


मानहानीच्या प्रकरणात जामीन मंजूर
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक  यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी (Mumbai Cruise Drug Case) एक मोठा गौप्यस्फोट केला होता. त्यांनी या सर्व प्रकरणामागे भाजप नेते मोहित कंबोज (Mohi Kamboj) यांचा हात असल्याचं सांगितलं होतं. ज्यानंतर कंबोज यांनी त्यांच्यावर मानहानीचा दावा टाकला होता. याप्रकरणी मलिक यांना नुकताच 15 हजारांचा वैयक्तिक जामीन कोर्टाने मंजूर केला आहे.


आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर नवाब मलिक यांनी दररोज एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्यावर कुटुंबियांवर समाज माध्यमांवरून तसेच पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप  करण्यास सुरूवात केली होती. मलिक यांचे आरोप वानखेडे कुटुंबियांनी फेटाळल्यानंतरही मलिक यांनी नव-नवे आरोप करणं सुरूच ठेवलं. त्यामुळे अखेर ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत मलिक यांच्याविरोधात सव्वा कोटी रूपयाच्या नुकसान भरपाईचा दावा ठोकला. मात्र उच्च न्यायालयाच्या एकलपीठानं नवाब मलिक यांना बोलण्याचा अधिकार असल्याचं स्पष्ट करत वानखेडे यांची विनंती फेटाळून लावली. 


महत्त्वाच्या बातम्या :