एक्स्प्लोर
49 कोटींचं कर्ज थकवल्याने मंत्री निलंगेकरांची कंपनी लिलावात

लातूर : कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकरांशी संबंधित कंपनी लिलावात काढण्यात आली आहे. वसुली थकवल्यानं निलंगेकरांशी संबंधित असलेल्या या कंपनीवर वसुली प्राधिकरणातर्फे कारवाई करण्यात आली आहे. साकोळच्या व्हिक्टोरिया अॅग्रोच्या मशिनरी आणि जमीन लिलावास काढली आहे. या संदर्भातली जाहिरात आजच्या वर्तमानपत्रांमध्ये देण्यात आली आहे. त्यामध्ये भाजपचे निलंग्याचे आमदार आणि मंत्री संभाजी निलंगेकरांचाही उल्लेख आहे. 49 कोटी 31 लाख रुपये भरण्यास असमर्थता दाखवल्यामुळे व्याजासह ही रक्कम 85 कोटी 46 लाख रुपयांच्या घरात गेली आहे. युनियन बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्रसाठी ही वसुली केली जाणार आहे. 22 सप्टेंबर 2016 रोजी हा लिलाव होणार आहे.
Before You Go
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















