एक्स्प्लोर

आरक्षण गेलं खड्ड्यात! पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा, छत्रपती संभाजीराजेंचा संताप

शेतकऱ्याच्या देठालाही हात लावता कामा नये' असं शिवाजी महाराज अधिकाऱ्यांना उद्देशूनच म्हणाले होते. ते आजही तंतोतंत खरे आहे, असा अप्रत्यक्ष इशारा देखील छत्रपती संभाजीराजे यांनी नेत्यांसह प्रशासनाला दिला आहे.

मुंबई :  मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने आणि आरक्षण न मिळाल्याने प्रवेशापासून वंचित राहिलेल्या उस्मानाबादच्या एका मराठा विद्यार्थ्यांच्या आत्महत्येनंतर कोल्हापूरचे छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला आहे. आरक्षण गेलं खड्ड्यात!, पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विटरवरून केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील देवळालीतील अक्षय शहाजी देवकर या मुलाला 94 टक्के गुण मिळून देखील त्याला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नव्हता.  दहावीला 94 टक्के गुण घेऊनही मराठा असल्यामुळे चांगल्या कॉलेजला अॅडमिशन मिळाले नाही. या घटनेचा दाखला देत छत्रपती संभाजीराजे यांनी पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करण्याची मागणी केली आहे. समाजाचे अग्रणी म्हणून आपण सर्वांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सरकारमधील नेते असोत किंवा विरोधी पक्षतील. 'योग' करत आपण दोन मिनिट शांत बसून विचार करू, की का म्हणून आपण राजकारणात आहोत? आपल्याला नेमकं काय मिळवायचंय?, असे सवालही छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहेत. भाषणात बोलताना देशहित समाजहिताच्या गोष्टी आपण करत असतो. परंतु वास्तवात आपलं आचरण त्या प्रकारचं आहे का? की उगाच 'मुह में राम, बगल में सूरी' असा प्रकार चालू आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे. नाहीतर आज एवढा हुशार बालक आत्महत्येला प्रवृत्त होतोच कसा? त्याच्या आयुष्याची तर खरी सुरुवात होती, असा संतप्त सवाल छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत. ज्यांच्यामुळे या राष्ट्राचे भविष्य सुरक्षित राहील ते युवक आणि ज्यांच्यामुळे आपलं आज जीवंत आहोत सुरक्षित आहे ते शेतकरी. या सर्वांना असुरक्षित का वाटतंय ? का म्हणून ते स्वतःला संपवत आहेत, असा सवालही छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे की, मला वाटतंय की आपल्या 'व्यवस्थेतच' मोठा दोष आहे. मराठा, धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचे प्रश्न मार्गी का लागत नाहीत? शेतकऱ्याच्या बांधावर स्वातंत्र्यानंतरही इतकी वर्षे पाणी का गेलं नाही? शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारभाव का मिळत नाही? असे अनेक प्रश्न राज्यासमोर आ वासून उभे आहेत. यामध्ये नेत्यांसोबत प्रशासनसुद्धा तेवढंच जबाबदार आहे. केवळ नेत्यांवर प्रत्येक गोष्ट शेकते, म्हणून तुमच्यावर कुणाचं लक्षच नाही असं समजू नका. 'शेतकऱ्याच्या देठालाही हात लावता कामा नये' असं शिवाजी महाराज अधिकाऱ्यांना उद्देशूनच म्हणाले होते. ते आजही तंतोतंत खरे आहे, असा अप्रत्यक्ष इशारा देखील छत्रपती संभाजीराजे यांनी नेत्यांसह प्रशासनाला दिला आहे. संबंधित बातम्या

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू करण्याचं विधेयक विधानसभेत मंजूर

मराठा आरक्षण कायदा झाला नाही तर मराठा समाज वंचित आघाडीसोबत जाईल : हर्षवर्धन जाधव

मराठा आरक्षण : पीजी मेडिकल प्रवेशाच्या अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी

मराठा आरक्षण : समाजाला आरक्षणाची गरज राहणार नाही तेव्हा मराठ्यांऐवजी इतर जातीचा समावेश

मराठा आरक्षण : कुणबी आणि मराठा एकच असले तरी त्यांच्या चालीरीतीत फरक, आरक्षण समर्थक याचिकाकर्त्यांचा दावा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ahilyanagar Crime : खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
High court: पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीLadki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHASaif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघडSaif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ahilyanagar Crime : खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
खळबळजनक! नऊ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत हत्येचा थरार 
Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
High court: पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
Embed widget