एक्स्प्लोर

'निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान', संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे निर्लज्ज लोकांचं देश म्हणजे हिंदुस्थान आहे असे संभाजी भिडे म्हणालेत.

सांगली : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.  सांगलीत बोलताना त्यांनी म्हटलं आहे की, जगात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला आपला देश मग आपला क्रमांक एक नंबर कधी येणार. तो क्रमांक एक आपण मिळवला आहे. कुठल्या गोष्टीत लोकसंख्येमध्ये आपल्याला जमलं नाही चीन पुढे आहे. जो आपला कट्टर दुश्मन मारेकरी पण हिंदू ना मेंदू असतो. यात आपला क्रमांक एक आहे, तो म्हणजे निर्लज्ज पणात. जगाच्या पाठीवरती 187 राष्ट्र आहेत. त्या राष्ट्रात राहण्याचा बेशरमपणाचा हा देश आहे. लाज वाटत नाही. निर्लज्ज लोकांचं देश म्हणजे हिंदुस्थान आहे असे संभाजी भिडे म्हणालेत.

दुर्गामाता दौडीस बंदी घालणारे राज्यकर्ते बेशरम
संभाजी भिडे म्हणाले की, दारुची दुकाने उघडी ठेवायला सांगणारे आणि दुर्गामाता दौडीस बंदी घालणारे राज्यकर्ते बेशरम, नालायक आहेत. जसे प्रभू रामचंद्र विवेक हरवून सोन्याच्या हरणाच्या मागे गेले आणि सीतेचे अपहरण झाले तसे राज्यकर्त्यांचा विवेक हरवलाय. शिवाजी-संभाजी महाराजांची अंतकरणात वस्ती असती तर संपूर्ण देशाचे नेतृत्व करणारे राज्यकर्ते झाले असते. 

दसऱ्यानिमित्त शिवप्रतिष्ठान  हिंदुस्थान  कडून काढल्या जाणाऱ्या दुर्गामाता  दौडीस परवानगी न दिल्याच्या विषयावरुन  शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे राज्यकर्त्यांवर  आणि महाविकास आघाडीवर चांगलेच भडकलेत. प्रभू रामचंद्रना जसे सोन्याच्या हरणाची  भुरळ पडली आणि  राम आपला विवेक हरवून बसले आणि त्या सोन्याच्या हरणाची शिकार करायला गेले, पुढे सीतेचे अपहरण झाले तसे आताच्या राज्यकर्त्यांच्या अकला, बुद्धी,मेंदू विकारवश झालेत, त्यामुळेच तर दुर्गामाता दौड करण्यास आम्हाला परवानगी दिली नाही. पण हेच राज्यकर्ते लॉकडाऊन झाल्यानंतर 21 व्या दिवशी महसूल वाढतो म्हणून राज्यभरातील दारूची दुकाने उघडी ठेवा म्हणून सांगतात आणि दुर्गामाता दौडीस बंदी घालतात ते राज्यकर्ते बेशरम, नालायक आहेत अशा शब्दांत भिडेनी सरकारवर टीका केलीय. दसऱ्यानिमित्त साध्या पध्दतीने आयोजित केलेल्या दुर्गामाता दौडीच्या समारोप प्रसंगी बोलताना संभाजी भिडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय.

कोरोना म्हणजे चीनने तुम्हा-आम्हाला पालथे पाडण्यासाठी केलेली बदमाशी
भिडे यांनी पुन्हा एकदा कोरोनावर बोलताना चीनवर टीकेची झोड उठवली.  कोरोना म्हणजे चीनने तुम्हा-आम्हाला पालथे पाडण्यासाठी केलेली बदमाशी आहे. कोरोना हा काल्पनिक, ना स्त्री ना पुरुष अशा मनोवृत्तीच्या माणसांना होणार रोग आहे. कोरोना थोतांड आहे असे भिडे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget