शिर्डी : खोट्या पादुका व खोटी नाणी घेऊन देशभर भ्रमण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे साई संस्थानच्या वतीने सांगण्यात आले आहे. साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.
गेल्या काही दिवसांपासून साईंच्या खोट्या पादुका आणि खोटी नाणी घेऊन फिरणाऱ्यांच्याबद्दल साई संस्थानकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. यावर तपासासाठी साई संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त मोहन जयकर, बिपीन कोल्हे यांची समिती नेमली होती.
या समितीचा अहवाल नुकताच साई संस्थानच्या बैठकीत देण्यात आला. त्या आधारे खोट्या पादुका आणि खोटी नाणी घेऊन देशभर फिरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
त्याशिवाय, साई संस्थानच्या नावाने बनावट वेबसाईट चालवणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती, साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी दिली.
‘साईंच्या खोट्या पादुका घेऊन फिरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार’
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Dec 2017 02:50 PM (IST)
साईबाबांच्या खोट्या पादुका आणि खोटी नाणी घेऊन फिरणाऱ्यांवर कायदेशी कारवाई करणार असल्याची माहिती साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरेंनी दिली.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -