नागपूर : बडोद्यात आयोजित 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या गळ्यात पडली आहे. लक्ष्मीकांत देशमुख हे विदर्भातील लेखक असून त्यांची 13 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.
संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासोबत राजन खान, रवींद्र शोभणे, किशोर सानप, रवींद्र गुर्जर अशी पंचरंगी लढत होती. देशमुखांना 427 मतं मिळाली, तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या शोभणे यांना 357 मतं मिळाली. नागपुरात मतमोजणीनंतर संमेलनाच्या अध्यक्षांची घोषणा करण्यात आली.
लक्ष्मीकांत देशमुख यांची साहित्यसंपदा
अंधेरनगरी - कथा
इन्कलाब विरुद्ध जिहाद - कादंबरी
नंबर १ - कथासंग्रह
ऑक्टोपस - कथासंग्रह
पाणी! पाणी! -
प्रशासननामा - कायदेविषयक, सामाजिक लेखन
अग्नीपथ - कथासंग्रह
अविस्मरणीय कोल्हापूर - माहितीपर लेखन
बखर – भारतीय प्रशासनाशी – राजकीय, सामाजिक लेखन
दूरदर्शन हाजीर हो - नाटक
मधुबाला ते गांधी - व्यक्तीचित्रण
सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी
शनिवारी संध्याकाळी पाच वाजता संमेलनाध्यक्षपदासाठीचं मतदान पूर्ण झालं. म896 मतपत्रिका पोचल्या होत्या. विदर्भ साहित्य संघातून सर्वाधिक 175 मतपत्रिका प्राप्त झाल्या, तर मुंबई मराठी साहित्य संघातून केवळ 122 मतपत्रिका पोहोचल्या होत्या.