एक्स्प्लोर

साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा राजीनामा

श्रीपाद जोशी यांनी आज आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा साहित्य विश्वात खळबळ उडाली आहे. पण साहित्य संमेलन होईपर्यंत यावर निर्णय होणार नाही, अशी माहिती मिळत आहे. उद्याच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होईल.

यवतमाळ : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी आज आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा साहित्य विश्वात खळबळ उडाली आहे. पण साहित्य संमेलन होईपर्यंत यावर निर्णय होणार नाही, अशी माहिती मिळत आहे. उद्याच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होईल. ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवलेलं मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाचं निमंत्रण आयोजकांनी रद्द केलं होत. त्यामुळे साहित्य क्षेत्रात मोठा गदारोळ माजला होता. आयोजकांकडून सुरक्षेच्या कारणावरून निमंत्रण रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होत. त्यामुळे साहित्यिकांसह अनेक क्षेत्रातल्या लोकांनी साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकला आहे. या वादानंतर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी आज महामंडळ उपाध्यक्ष विद्या देवधर यांना ई-मेलने राजीनामा पाठवला. मात्र साहित्य संमेलन होईपर्यंत राजीनाम्यावर निर्णय होणार नाही, अशी माहिती मिळत आहे. उद्या यासंबंधी बैठक होणार आहे. त्यानंतर याबाबत निर्णय होईल. येत्या 11 जानेवारीपासून यवतमाळ येथे 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होणार आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संमेलनाची सुरुवात वादाने झाली आहे. नयनतारा सहगल यांना आमंत्रण देऊन नंतर रद्द केल्यामळे अनेक मान्यवरांनी साहित्य संमेलनाला न जाण्याचा निर्णय घेतला होता. तसेच महामंडळाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याचीही मागणी होत होती. विशेष म्हणजे श्रीपाद जोशी यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ पुढील 3 महिन्यात संपणार होता. अशात साहित्य संमेलन सुरू होण्यापूर्वी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष यांनी राजीनामा दिला आहे. काय आहे वाद? यवतमाळमध्ये 92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 11 जानेवारी पासून सूरु होत आहे. या संमेलनाला उद्घाटक म्हणून इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना आयोजन समितीकडून आमंत्रण देण्यात आले होते. मात्र त्यांच्या नावाला काही संघटनांकडून विरोध करण्यात आला होता. मराठी साहित्य संमेलनामध्ये इंग्रजी लेखिका कशा, असे म्हणून संमेलन उधळून लावू अशी भाषा केली होती. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्या सांगण्यावरून यवतमाळ आयोजन समितीने नयनतारा सहगल यांना पाठविलेले निमंत्रण रद्द केले होते. त्यानंतर सर्व साहित्य क्षेत्रातील व्यक्ती आणि विविध स्तरातून निमंत्रण रद्द केल्याबद्दल टीका करण्याात आली होती. आता त्यानंतर या संमेलनाच्या नव्या उद्घाटकाचे नाव सुचविण्यात यावे, असे महामंडळाने आयोजन समितीला सांगितले होते. यवतमाळ आयोजन समितीने काल साहित्य महामंडळाला उद्घाटक म्हणून चार व्यक्तींची नावं सुचवली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Ramesh Mhatre Dombivli Case:
"पोत्यांनी पैसा देऊन वकील लावले तरी 'त्या' देवाच्या न्यायालयात तुझी सुटका नाही"; रमेश म्हात्रेंच्या हल्ल्यानंतर डॉक्टरांच्या आईची काळजाला भिडणारी पोस्ट
Sanjay Raut: सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी: जेजुरीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी: जेजुरीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू
Kolhapur Asmita Katkar Death Case: मुलाचे कपडे घेतलेले, पण मुलगी झाली; 52 हजारांचा पाळणा, 4 जणांनी माझ्या मुलीचा जीव घेतला, अस्मिताच्या आई-वडिलांचे हादरवणारे आरोप
मुलाचे कपडे घेतलेले, पण मुलगी झाली; 52 हजारांचा पाळणा, 4 जणांनी माझ्या मुलीचा जीव घेतला, अस्मिताच्या आई-वडिलांचे हादरवणारे आरोप

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Actor Sanjeeb Singh Dies Of Heart Attack: 13 तासांचं वर्किंग शेड्यूल, शुटिंगवेळीच अस्वस्थ वाटू लागलं अन्...; प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
13 तासांचं वर्किंग शेड्यूल, शुटिंगवेळीच अस्वस्थ वाटू लागलं अन्...; प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
Ahilyanagar Shrirampur Band : श्रीरामपुरात गुन्हेगारीविरोधात जनक्षोभ! हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येनंतर सलग दुसऱ्या दिवशी शहर कडकडीत बंद; मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवून आंदोलन, नेमकं काय घडलं?
श्रीरामपुरात गुन्हेगारीविरोधात जनक्षोभ! हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येनंतर सलग दुसऱ्या दिवशी शहर कडकडीत बंद; मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवून आंदोलन, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut: सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Eknath Khadse and Sudhir Mungantiwar: Eknath Khadse and Sudhir Mungantiwar: नाथाभाऊंच्या घरवापसीची चर्चा, मुनगंटीवार म्हणाले, 'जेव्हा भाजपकडे काहीच नव्हतं तेव्हा खडसेंनी पक्षासाठी जीव लावून काम केलंय'
नाथाभाऊंच्या घरवापसीची चर्चा, मुनगंटीवार म्हणाले, 'जेव्हा भाजपकडे काहीच नव्हतं तेव्हा खडसेंनी पक्षासाठी जीव लावून काम केलंय'
Sanjay Ghadi : दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र, नेमकं काय म्हटलंय?
दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र, नेमकं काय म्हटलंय?
Sachin Ahir on Omraje Nimbalkar: टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
NCP on Chief Minister Post: 'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
Rahul Dravid Coach : ब्रँडन मॅक्क्युलम OUT, राहुल द्रविड IN?, इंग्लंड क्रिकेट बोर्डाची मोठी खेळी; 'द वॉल' होणार कसोटी संघाचा मुख्य कोच?
ब्रँडन मॅक्क्युलम OUT, राहुल द्रविड IN?, इंग्लंड क्रिकेट बोर्डाची मोठी खेळी; 'द वॉल' होणार कसोटी संघाचा मुख्य कोच?
Embed widget