बारामती : मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर हातकणंगले मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केलंय. दौंड तालुका कृषी उत्पादक व प्रक्रिया सहकारी संस्था आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपा किसान मोर्चाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय दौंड कृषी महोत्सव प्रदर्शनाला सदाभाऊंनी भेट दिली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर सडकून टीका केली. खोटं रक्त दाखवणं, पायाला फोड आलेले फोटो दाखवणं हे शेट्टींचं काम आहे, अशा शब्दात सदाभाऊ यांनी शेट्टींवर टीका केली.
सदाभाऊ म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला, तर मी हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी तयार आहे. कारण, हातकणंगलेमधील जनतेला आता बहुजन चेहरा हवा आहे. बहुजन समाजातीलच व्यक्तीला हातकणंगले मतदारसंघातील जनतेला खासदार करायचं आहे.”
दरम्यान, राज्यातील विविध भागात सदाभाऊ खोत यांना विरोधाचा सामना करावा लागतो आहे. सदाभाऊ शुक्रवारी कुर्डुवाडीतील कार्यक्रमाला जात असताना, काही शेतकरी आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांच्या ताफ्यावर दगडफेक केली. तसेच त्यांना काळे झेंडे दाखवले.
खासदार राजू शेट्टी यांच्यावरही सदाभाऊंनी सडकून टीका केली. लोकसभेत प्रश्न मांडण्याएेवजी गल्लीत येऊन प्रश्न कायम असल्याचे सांगत दिशाभूल करण्याचा प्रकार करतात. त्यांची ही कृती म्हणजे दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गजरा घालून हिंडायचा प्रकार असल्याचं ते यावेळी म्हणाले.
त्यापूर्वी जालना जिल्ह्यीतल दौऱ्यावेळीदेखील सदाभाऊंना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रोषाचा सामना करावा लागला होता. जालना दौऱ्यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊंना काळे झेंडे दाखवत तीव्र विरोध दर्शवला. यानंतर सदाभाऊंना आपला दौरा अर्धवट सोडावा लागला.
संबंधित बातम्या
VIDEO : सोलापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे : सदाभाऊ खोत
सदाभाऊंच्या ताफ्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दगडफेक
'...तर हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार'
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Feb 2018 08:51 AM (IST)
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर हातकणंगले मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केलंय.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -