बोंडअळी आणि तुडतुडे किडीच्या प्रादुर्भावामुळे 33 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या कापूस, धान पिकासाठी कोरडवाहू क्षेत्रासाठी 6800 रुपये, तर बागायतीसाठी 13500 रुपये प्रतिहेक्टर मदत देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उशिराच का होईना पण काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
दरम्यान ही मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. या रकमेतून बँकेने कोणतीही वसुली करु नये असे निर्देश मदत पुनर्वसन आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.