एक्स्प्लोर
जो तो आपल्या कर्तृत्वानं मोठा आणि छोटा होतो: सदाभाऊ खोत

पिंपरी-चिंचवड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आत्मक्लेश पदयात्रेकडे पाठ फिरवणाऱ्या सदाभाऊ खोता यांनी पिंपरी-चिंचवडमधील सांगवीतल्या शेतकरी आठवडी बाजाराच्या उद्घाटनाला हजेरी लावली. यावेळी बोलताना सदाभाऊ खोत यांनी यशवंतराव चव्हाणांच्या वक्तव्याचा आधार घेत पुन्हा एकदा राजू शेट्टींना टोला लगावला आहे. ‘राजकारण आणि समाजकारणात कोणीच कोणाला मोठं करत नाही अथवा संपवत नाही. जो तो आपल्या कर्तृत्वानं मोठा आणि छोटा होत असतो.’ असा टोला सदाभाऊ यांनी राजू शेट्टी यांना लगावला आहे. ‘मी पणन आणि कृषी खात्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचत आहे.’ असंही यावेळी ते म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या शिवारावरील संवाद यात्रेत सहभागी होणार असल्याचं ही सदाभाऊंनी सांगितलं. संबंधित बातम्या: राजू शेट्टींच्या आत्मक्लेश यात्रेत सदाभाऊ खोत अनुपस्थित राजू शेट्टी, बगलबच्च्यांना लगाम घाला : सदाभाऊ खोत खासदार राजू शेट्टींचा सदाभाऊ खोत यांना अल्टिमेटम गोफण तयार, योग्य वेळी भिरकावण्यास सज्ज : सदाभाऊ खोत राजू शेट्टींनी आयुष्यभर तत्वाशी एकनिष्ठ राहावं: सदाभाऊ खोत मुलाच्या पुनर्वसनासाठी राजकारणात आलो नाही : सदाभाऊ खोत
आणखी वाचा























