एक्स्प्लोर

Sadabhau Khot on Anil Parab : स्मशानात जा आणि भुतांशी बोला, सदाभाऊ खोत यांचा अनिल परब यांना खोचक सल्ला

STचं आंदोलन गेल्या चौदा दिवसांपासून सुरूय, एसटीचं विलिनीकरण शासनामध्ये करावं ही या आंदोलकांची मागणी आहे. सदाभाऊ खोत यांनी अनिल परब यांना स्मशानात जाऊन भुतांशी बोला असा खोचक सल्ला दिलाय.

मुंबईतील आझाद मैदानात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांसह परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर हल्लाबोल केला. अनिल परब म्हणतात चर्चा कुणाशी करायची, अरे मग तुम्ही स्मशानात जा आणि भुतांशी चर्चा करा, असा घणाघात सदाभाऊ खोत यांनी केला. ते एबीपी माझाशी बोलत होते.

एसटीचे शासनामध्ये विलीनीकरण करावं या मागणीसाठी गेल्या 14 दिवसांपासून आंदोलन करणारे एसटी कर्मचारी आता आक्रमक झालेले असून ते राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर मोर्चा काढण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. परबांच्या घरावर मोर्चा काढणाऱ्या या मोर्चेकऱ्यांना सध्या आझाद मैदानावरच अडवण्यात आलं आहे. दरम्यान, अनिल परब यांच्या सरकारी निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 

आझाद मैदानावरील आंदोलकांनी राज्य सरकार विरोधात मोठी घोषणाबाजी सुरु आहे. सरकार आंदोलकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असून आम्ही परबांच्या घरावर मोर्चा करणार काढण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं आमदार गोपीचंद पडळकरांनी सांगितलं. 

अनिल परब आणि कर्मचारी संघटनांसोबत बैठक सुरु असून त्यामध्ये कर्मचारी संघटना या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. 

दरम्यान, सध्या उपलब्ध पर्यायांपैकी खासगीकरण हा एक पर्याय आहे. पण त्यावर कोणतीही चर्चा झालेली नाही.  इतर राज्यांमधील परिवहन मंडळाचा अभ्यास करुन  निर्णय घेऊ आणि याबाबत अधिकाऱ्यांकडून अहवाल तयार करण्याचं काम सुरु आहे असं अनिल परबांनी या आधी स्पष्ट केलं आहे. 

 

 

एसटीच्या विलीनीकरणाची मागणी पूर्ण करण्याची मागणी भाजप नेत्यांकडून होत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केले आहे. कामगारांच्या अडचणी आणि विलीनीकरण याच्यातला मध्यममार्ग सुचवला असून सरकारने निर्णय घ्यावा असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे एसटीचे विलीनीकरण सध्या तरी अशक्य असल्याचे म्हटले जात आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad Result 2026: विधान परिषदेचा पहिला कल महाविकास आघाडीच्या बाजूने, मविआ 3 तर महायुती 2 जागांवर आघाडीवर
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Live: विधान परिषदेचा पहिला कल महाविकास आघाडीच्या बाजूने, मविआ 3 तर महायुती 2 जागांवर आघाडीवर
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
ऊसाला पहिली उचल 4500 घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळालाच पाहिजे, शेट्टींचा इशारा
ऊसाला पहिली उचल 4500 घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळालाच पाहिजे, शेट्टींचा इशारा
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar : 'मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातंय? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही'; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
'मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातंय? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही'; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
Gold Price: सोन्याच्या दरात घसरण सुरुच मात्र 2027 मध्ये सोनं 2 लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा मोठा अंदाज
सोन्याच्या दरात घसरण सुरुच मात्र 2027 मध्ये सोनं 2 लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा मोठा अंदाज
Pune Teacher Election Result : लोकशाहीतील मतदानाच्या परीक्षेत तब्बल 1675  गुरुजींची मतं बाद, पुणे शिक्षकमधील धक्कादायक आकडेवारी समोर
पुणे शिक्षकच्या निवडणुकीत 1675  गुरुजींची मतं बाद, मतमोजणीवेळी धक्कादायक आकडेवारी समोर
Indian Railway Travel Insurance : अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
Pradeep Purnekar : राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
Embed widget