मुंबई :  माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)  पीएमार्फत पैसे घेत होते, असे म्हणत   निलंबीत  पोलीस अधिकारी सचिन वाझेने (Sachi Waze)  आरोपांचा बॉम्ब फोडला. एवढच नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis)  पत्र लिहिले असून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar)  गटाचे जयंत पाटील यांचे नाव असल्याचा उल्लेख केला. जयंत पाटील (Jayant Patil) यांचे नाव घेतल्यानंतर मात्र महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले. अखेर सचिन वाझेने फडणवीसांना लिहिलेलं पत्र 'माझा'च्या हाती लागले असून पत्रातून सचिन वाझेने अनिल देशमुख, जयंत पाटलांवर  गंभीर आरोप केले आहे.  अनिले देशमुख गृहमंत्री असताना जयंत पाटील यांनी अवैध काम करुन घेतले. एवढच नाही तर  चांदीवाल समितीत मी जबाब देत असताना माझ्यावर अनिल देशमुख दबाव आणत होते असा आरोप वाझेने केले आहे.


सचिन वाझेने फडणवीसांना पत्र लिहिलेल्याचा बॉम्ब तर फोडला मात्र  त्या पत्रात नेमके काय लिहिले या संदर्भातील सविस्तर माहिती समोर आली नव्हती. अखेर आज ही माहिती समोर आली आहे. आपल्या पत्रात सचिन लिहिले आहे की,    सचिन वाझे हे मुंबई पोलिस दलातील गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुखपदी असाताना अवैध हुक्का पार्लर आणि भारतातील सर्वात मोठ्या वितरकास अटक केली होती. अटक केल्यानंतर  जयंत पाटील यांच्या शासकीय बंगल्यावरून आरोपींना सोडण्याबाबत आणि त्या बदल्यात दुसऱ्याला  अटक करण्याबाबत फोन आल्याचा दावा वाझेंनी  केला आहे.  वाझेनी  या आरोपाची ऑडिओ रेकॉर्डिंगही असल्याचा दावा केला असून सीडीआर द्वारेही माहिती समोर येईल असं म्हटलं आहे. 


चांदिवाल समितीसमोर जबाब देत असताना माझ्यावर दबाव : सचिन वाझे


 न्यायमूर्ती चांदीवाल चौकशी अहवाल हा महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) कार्यकाळात आला होता. या चांदीवाल समितीसमोर जबाब देत असताना  माझ्यावर अनिल देशमुख दबाव आणत होते असा आरोप वाझेने केला आहे.


सचिन वाझेचे ठाण्याच्या पोलिस निरीक्षक विजय देशमुखांवर गंभीर आरोप


तसेच  सचिन वाझेने  नवीन मोठा खुलासा केला आहे.   ठाणे पोलिस निरीक्षक विजय देशमुख यांना लिहिलेले पत्र सचिन वाझेच्या पत्रासोबत जोडलेले दुसरे पत्र समोर आले  आहे.   ⁠पोलिस निरीक्षक विजय देशमुख यांच्या बदली करता  25 लाख रुपये घेतले होते. ⁠सुखदा या निवासस्थानी 25  लाख रुपये  घेतले होते. पैसे परत न केल्यास आमरण उपोषण करण्याचे पत्र विजय देशमुख यांनी दिले होते . ⁠पोलिस निरीक्षक विजय देशमुख ठाणे येथे कार्यरत होते.  पत्रात पुन्हा एकदा शरद पवार, अनिल देशमुख आणि जयंत पाटील यांचा उल्लेख केला आहे.अनिल देशमुख यांच्या दबावाखाली येऊन अनेक अवैध कामे केली  आहे. 


Video :  सचिन वाझेनं फडणवीसांना लिहिलेलं पत्र 'माझा'च्या हाती



Devendra Fadnavis : मविआच्या कार्यकाळात चांदीवाल अहवाल आला असताना कारवाई का केली नाही? देवेंद्र फडणवीसांचा पलटवार