अहमदनगर : विरोधी पक्षांनी केंद्रीय तपास यंत्रणेकडून तपासासाठी आग्रह धरण म्हणजे आम्हाला काळजीच वाटते की यात कुठले राजकारण तर नाही ना? सचिन वाझे प्रकरणात काळजीच्या गोष्टी वाटतायत. मात्र, तपास सुरू असल्याने त्यावर सध्या बोलणे योग्य नसल्याचं महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. संगमनेरमध्ये आयोजित विविध कार्यक्रमानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.


संगमनेर तालुक्यातील भाऊसाहेब थोरात यांच्या पुण्यतिथी निमित्त आज विविध कार्यक्रम संपन्न झाले. यात साखर कारखाना इथेनॉल प्रकल्प उद्घाटन व भाऊसाहेब थोरात स्मृती दिन साजरा करण्यात आला. यावेळी कारखाना कार्यस्थळावर आयोजित कार्यक्रमाला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यासह माजी खासदार भालचंद्र मुणगेकर उपस्थित होते. यावेळी कार्यस्थळावर आयोजित कार्यक्रमात मोठी गर्दी झाल्याच दिसून आलं.


सरकार बदलत असतात पण पोलिस यंत्रणा आहे तीच असते. महाराष्ट्र आणि मुंबईची पोलीस यंत्रणा ही जगप्रसिद्ध आहे. स्कॉटलँड यार्ड नंतर आपलं नाव घेतलं जातं. पोलिसांच मनोबल खच्ची होणार नाही, याची काळजी सत्ताधारी आणि विरोधकांनी घ्यायला हवी. विरोधक सत्तेत होते तेव्हा तेच पोलीस दल होतं. आपलं पोलीस दल सक्षम असून आमचा त्यावर विश्वास असल्याची प्रतिकया महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सचिन वाझे प्रकरणी दिलीय.


राज्यात लॉकडाऊन करण्यासंदर्भात थोरातांनी  कोरोनाची दुसरी लाट आली असताना आपण मात्र बेफिकीर झालोत. ही बेफिकेरी आपल्याला त्रासदायक ठरणार असल्याचे म्हटलंय. सरकारकडून केवळ अपेक्षा करण्यापेक्षा सरकारला सहकार्य करणं गरजेच आहे. स्वत: आणि कुटुंबासाठी कोरोना नियमावलीच पालन करावे, असं महसुलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणालेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Sachin Vaze | अटकपूर्व जामीन अर्जात एपीआय सचिन वाझे म्हणतात...


एपीआय सचिन वाझेंकडून सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल 


Mansukh Hiren Death | मनसुख हिरेन यांची आत्महत्या नसून हत्याच; हिरेन कुटुंबियांचा आरोप


ख्वाजा युनूसच्या मृत्यूनंतर एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांचं आयुष्यचं बदलून गेलं..