Maharashtra Water Issue: राज्यात अनेक भागात आत्तापासूनच पाणी टंचाई (Water Issue) जाणवत असल्याने गाव आणि वाड्यांवर टँकरद्वारे (Tanker) पाणीपुरवठा करावा लागतोय. कुठे शासकीय तर कुठे खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. राज्यातील 70 गावं आणि 204 वाड्यांवर 75 टँकरद्वारे सद्या पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात 7 शासकीय तर 68 खाजगी टँकरचा समावेश आहे. ज्यात सर्वाधिक टँकर ठाणे आणि पालघर जिल्ह्याला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. 

राज्यात उन्हाचा चटका वाढतोय, त्यामुळे पाण्याची मागणी देखील वाढू लागली आहे. त्यातच पाण्याची पाणीपातळी घसरत आहे. बोअरवेल आणि विहिरीतील पाणी देखील कमी होत आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यातच अनेक भागात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. ग्रामीण भागात याचे सर्वाधिक परिणाम जाणवत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात आता पाण्याच्या टँकरची मागणी होऊ लागली आहे. पंचायत समितीकडे अनेक प्रस्ताव येत आहे. त्यामुळे मागणी करणाऱ्या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील गावं आणि वाड्यांवर 75 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात सर्वाधिक 22 टँकर ठाणे आणि पालघर जिल्ह्याला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर मराठवाड्यात सध्या एकही टँकर सुरु नाही. 

पाहा कोणत्या जिल्ह्यात किती टँकर...

जिल्हा  गावं  वाड्या  शासकीय टँकर खाजगी टँकर एकूण 
ठाणे  20 100 00 22 22
रायगड  15 40 00 14 14
रत्नागिरी  12 16 02 02 04
पालघर  13 47 00 22 22
जळगाव  02 00 02 00 02
सातारा  00 01 03 00 03
अमरावती  02 00 00 02 02
बुलढाणा  06 00 00 06 06
एकूण  70 204 07 68 75

मराठवाड्यासाठी 100 कोटी 73 लाखांचा विशेष टंचाई कृती आराखडा 

मराठवाड्यातील काही भागांमध्ये आत्तापासून पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतोय. त्यामुळे पुढील काळात पाणी टंचाई निर्माण होण्याचू शक्यता लक्षात घेता प्रशासनाकडून देखील तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यासाठी 100 कोटी 73 लाखांचा विशेष टंचाई कृती आराखडा शासनाकडून प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. ज्यात विभागातील 5 हजार 386 गावं आणि वाड्यांना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक टँकर

राज्यातील 70 गावं आणि 204 वाड्यांवर 75 शासकीय आणि खाजगी टँकरद्वारे सद्या पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात 7 शासकीय तर 68 खाजगी टँकरचा समावेश आहे. मात्र सर्वाधिक पाण्याचे टँकर ठाणे आणि पालघर जिल्ह्यात सुरु आहे. या दोन्ही जिल्ह्यात प्रत्येकी 22 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे ठाणे जिल्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वधिक पाणी टंचाई पाहायला मिळत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Beed : अंबाजोगाई शहरात तब्बल 12 दिवसाआड पाणीपुरवठा; सणासुदीच्या काळात पाण्यासाठी भटकंती