Amit Saha : आप्पासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) देऊन सरकारने लाखो लोकांना प्रेरणा देण्याचे काम केल्याचे मत गृहमंत्री अमित शाह (Minister Amit saha) यांनी व्यक्त केले. याबद्दल अमित शाह यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले. जीवनात एवढी गर्दी मी कधीच पाहिली नसल्याचे अमित शाह यांनी व्यक्त केलं. तुमच्या सर्वांच्या मनात डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (Dr. Appasaheb Dharmadhikari) यांच्याबद्दल किती सन्मान आहे हे समजत असल्याचे शाह म्हणाले. त्याग, समर्पण आणि सेवेच्या माध्यमातून आप्पासाहेबांनी मोठं काम केलं आहे. समाजसेवेचा संस्कार तीन पिढ्यात राहतो हे मी प्रथमच पाहत असल्याचे शाह म्हणाले. 


डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण देऊन सरकारनं योग्य व्यक्तिचा सन्मान केला आहे. याबद्दल मंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. त्याग, समर्पण आणि सेवेच्या माध्यमातून आप्पासाहेबांनी मोठं काम केल्याचे अमित शाह यावेळी म्हणाले.  मी फक्त डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा सन्मान करण्यासाठी दिल्लीतून मुंबईत आलो असल्याचे शाह म्हणाले.  


आप्पासाहेबांच्या संस्काराचा हा सन्मान 


जिथपर्यंत नजर पोहोचत नाही तिथपर्यंत लोक याठिकाणी जमले आहेत. राज्य सरकारनं योग्य व्यक्तीचा सन्मान केला असल्याचे अमित शाह म्हणाले. आप्पासाहेबांच्या संस्काराचा हा सन्मान आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी समाजाला मार्गदर्शन करण्याचे काम केलं आहे. वृक्षारोपण, रक्तदान, जलसिंचन, व्यसनमुक्त समाज, महालि सबलीकरणाचे काम आप्पासाहेबांनी केलं आहे. त्यांचे हे काम दिवसेंदिवस वाढत जावो, त्यांना चांगले निरोगी आयुष्य लाभो अशी प्रार्थना करत असल्याचे शाह म्हणाले. 


पुरस्कार सोहळ्यासाठी लाखो लोकांची उपस्थिती


ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी मुंबई येथील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. या पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी हजेरी लावली होती. या सोहळ्यासाठी लाखो लोकांनी उपस्थित दर्शवली होती. या कार्यक्रमावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.


महत्त्वाच्या बातम्या:


Dr. Appasaheb Dharmadhikari : पुरस्काराचं श्रेय सर्वांना, शेवटच्या श्वासापर्यंत समाजसेवेचं काम करणार : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी