एक्स्प्लोर

Girish Mahajan : संजय राऊत वाचाळवीर, तोंडात येईल तसे बडबडतात; गिरीश महाजन यांचा निशाणा

Jalgaon News Update : ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे.  

Jalgaon News Update : "एखाद्या निवडणुकीत निसटता विजय झाला आणि आपण फार मोठा तीर मारला असे समजण्याचे कारण नाही. शिवसेनेची अवस्था काय झाली आहे हे सर्वांना माहिती आहे. सर्वांना त्यांची कीव येते. पक्ष राहिला नाही, नाव राहिलं नाही, कार्यालय नाही, तरी देखील आपला भोंगा सुरु करायचा, संजय राऊत (Sanjay Raut) हे महाशय गेल्या दोन दिवसांपासून कशा पध्दतीने शिवराळ भाषा वापरत आहेत. संजय राऊत हे वाचाळवीर आहेत.  त्यामुळे ते तोंडात येईल तसे बडबड करतात. त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नाही, अशी टीका राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केली आहे.  

गिरीश महाजन यांनी यावेळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर देखील जोरदार टीका केली. "एकीकडे विधानसभेत अवैध धंद्यांबाबत लक्षवेधी मांडायची, मोठमोठ्याने भाषणे करायची आणि दुसरीकडे त्यांच्या मतदारसंघात पोलिसांनी छापा टाकला की माझी माणसे आहेत म्हणून पोलिसांना फोन करायचा, पोलिसांना धमकायचं. त्यामुळे खडसे साहेबांचं सर्व पितळ उघडं पडतयं. एकनाथ खडसे यांच्या अनेक चौकशा सुरु आहेत. नेमकी कोणती चौकशी सुरु आहे हे माहित नाही. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यानुसार ती चौकशी सुरु असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. 

"कापसाला एकीकडे 12 हजार रूपये भाव होता. मात्र सध्या जे भाव कापसाला आहेत ते खते आणि रासायनिक औषधांच्या तुलनेत खूप कमी आहे, असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला. "आंतराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापसाच्या गठाणींना भाव कमी झाल्यामुळे हा भाव थोडा तुटलेला आहे. पण सरकार निश्चित याबाबत सकात्मक विचार करत आहे. याच अधिवेशनामध्ये याबाबत निश्चित सकारात्मक निर्णय होईल. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर सर्व किंमतीची भाव वाढ अवलंबून असते. त्यामुळेच गॅस सिलेंडर असेल किंवा इतर वस्तूंचे दर वाढल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. 

गिरीश महाजन यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. "अडीच-तीन वर्ष लोक अडचणीत होते, लोक मरत होते तेव्हा घरातून पाय बाहेर काढला नाही. आता त्यांना उशीरा सुचलेले शहाणपण आहे. आता त्यांना लोकांचे प्रश्न दिसत आहेत, महागाई दिसत आहे. आता उद्धव ठाकरे यांना शिवसेनेतून काढून टाकले आहे असे म्हणण्याची वेळ आलीय. त्यामुळे यांनी आता कितीही सभा घेतल्या तरी त्याचा उपयोग नाही. लोकांनी एकदा संधी दिली होती. या संधीची यांनी माती केली, असा हल्लाबोल गिरीश महाजन यांनी केला.  

राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डॉन असल्याची टीका केली होती. त्यावरून मंत्री गिरीश महाजन यांनी आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे. "तुम्ही स्वत:ला डॉन समजत होते. लोकांना वळ येईपर्यत, जीव जाईपर्यंत मारहाण केली. त्यामुळे डॉन कोण आहे? चोर कोण आहे? हे लोकांना कळालेले आहे. त्यामुळे तुमच्या सर्टीफिकेटची गरज नाही, असे मंत्री महाजन यांनी म्हटलं आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget