गोंदिया : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ओव्हरलोड ट्रकवर आरटीओने दंडाची कारवाई केली आहे. नोटांचा ट्रक ओव्हरलोड झाल्याने गोंदियामध्ये आरटीओने रिझर्व्ह बँकेला 30 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.


छत्तीसगढच्या भिलाईमधून नोटांचा हा ट्रक नागपूरच्या रिझर्व्ह बँकेत नेण्यात येत होता. या ट्रकमध्ये 500 आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा होत्या. हा ट्रक देवरी नाक्यावर पोहोचला असता, त्याची तपासणी करण्यात आली.

16200 टन क्षमतेची परवानगी असताना या ट्रकमध्ये 21200 टन वजन होतं. ट्रकमध्ये पाच टन अतिरिक्त भार असल्याचं वाहन निरीक्षक आनंद मोड यांच्या लक्षात आलं. त्यानंतर ट्रकवर कारवाई करत 30 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.

 

या कारवाईनंतर बँक प्रशासनात खळबळ उडाली होती. परंतु स्वत: वाहतूक आयुक्त आणि बड्या अधिकाऱ्यांनी या प्रकणाराची दखल घेतल्याने, दंड आकारुन आरबीआयचा ट्रक सोडण्यात आला.